Women's T20I World Cup चा रंगणार थरार! भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी, पाहा संपूर्ण शेड्यूल

महिला टी20 वर्ल्डकपला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून 12 फेब्रुवारीला भारत वि. पाकिस्तान सामना रंगणार आहे.
Women's T20I World Cup 2023
Women's T20I World Cup 2023Dainik Gomantak

Women's T20I World Cup: दक्षिण आफ्रिकेमध्ये 10 फेब्रुवारीपासून टी20 महिला वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्डकपमधील पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका या महिला संघात खेळवण्यात येईल. या वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिलाच सामना 12 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होईल.

त्यामुळे भारतीय महिला संघासाठी टी20 वर्ल्डकपची मोहीम पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने सुरू होणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी प्रत्येक संघाला 6 ते 8 फेब्रुवारीदरम्यान प्रत्येकी २ सराव सामने खेळायचे आहेत. भारताचा पहिला सराव सामना 6 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तसेच नंतर 8 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सराव सामना होणार आहे.

Women's T20I World Cup 2023
T20 World Cup 2024 साठी ICC ने घेतला मोठा निर्णय, संघांमध्ये केला हा बदल

दरम्यान, महिला टी20 वर्ल्डकपचे हे आठवे पर्व असून यंदा एकूण 10 संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या 10 महिला संघांचा समावेश आहे.

या 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटात 5 संघांचा समावेश आहे. या दोन्ही गटातून पहिल्या दोन क्रमांकावर राहणारे संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीत विजय मिळवणारे दोन संघ अंतिम सामन्यात एकमेकांसमोर येतील.

या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. त्यानंतर 26 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळवला जाईल. उपांत्य आणि अंतिम फेरीतील सामने केपटाऊनमध्ये खेळवण्यात येणार आहेत. तसेच उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवसही असणार आहे.

Women's T20I World Cup 2023
U19 Women's T20 WC: भारताच्या पोरी, जगात भारी! शफालीची टीम इंडिया विश्वविजेती, इंग्लंड फायनलमध्ये पराभूत

असे आहे दोन गट -

या टी20 वर्ल्डकपसाठी करण्यात आलेल्या दोन गटांपैकी पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. तसेच दुसऱ्या गटात भारतासह इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे.

असा आहे भारतीय संघ -

आठव्या टी20 महिला वर्ल्डकपसाठी 15 जणींचा भारतीय संघाची घोषणा डिसेंबर 2022 मध्येच बीसीसीआयने केली आहे. या भारतीय संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे आणि उपकर्णधारपद स्मृती मानधनाकडे सोपवण्यात आले आहे.

भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका शरवन, अंजली सारवानी, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.

राखीव खेळाडू: एस मेघना, स्नेह राणा, मेघना सिंग.

Women's T20I World Cup 2023
T20 World Cup: विश्वचषकापूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का, दुखापतीमुळे 'ही' धाकड स्पर्धेतून आऊट

टी20 महिला वर्ल्डकप 2023 मधील भारतीय संघाचे वेळापत्रक

12 फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

15 फेब्रुवारी - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

18 फेब्रुवारी - भारत विरुद्ध इंग्लंड - गाकेबेरा, वेळ - संध्या 6.30 वा.

20 फेब्रुवारी - भारत विरुद्ध आयर्लंड - गाकेबेरा, वेळ - संध्या 6.30 वा.

उपांत्य आणि अंतिम फेरी -

23 फेब्रुवारी - पहिला उपांत्य सामना - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

24 फेब्रुवारी - दुसरा उपांत्य सामना - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

26 फेब्रुवारी - अंतिम सामना - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com