Hockey World Cup 2023: आजपासून रंगणार वर्ल्डकपचा थरार! एका क्लिकवर जाणून घ्या भारताचे वेळापत्रक

आजपासून हॉकी वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
Hockey World Cup 2023
Hockey World Cup 2023Dainik Gomantak

Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धा शुक्रवारपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा भारतातील ओडिशा राज्यात रंगणार आहे. ही 15 वी वर्ल्डकप स्पर्धा असून भारताने प्रत्येक वर्ल्डकपमध्ये सहभाग घेतला आहे.

दरम्यान, भारतीय संघ यंदा तब्बल 48 वर्षांचा विश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असेल. यापूर्वी भारताने 1975 साली वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर भारताला वर्ल्डकपवर नाव कोरता आलेले नाही. पण आता घरच्या मैदानावर मायदेशातील चाहत्यांसमोर भारतीय संघाला दुसऱ्यांदा वर्ल्डकप उंचावण्याची यंदा संधी आहे.

Hockey World Cup 2023
Men’s Hockey World Cup: हॉकी वर्ल्डकपपूर्वी सिंबाने घेतली ओडीशाच्या मुख्यमंत्र्यांची भेट

हॉकी वर्ल्डकप 2023 मध्ये भारताचा साखळी फेरीसाठी डी ग्रुपमध्ये समावेश आहे. या गटात स्पेन, इंग्लंड आणि वेल्स या संघांचाही समावेश आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा पहिला सामना शुक्रवारी स्पेनविरुद्ध बिरसा मुंडा स्टेडियम, रौउरकेला येथे होणार आहे. भारताचे साखळी फेरीतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता चालू होती. हे सामने स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर दिसणार आहेत.

Hockey World Cup 2023
Hockey India: वर्ल्डकप पदकाचा 47 वर्षांचा दुष्काळ संपवताच हॉकी संघाला 'एवढ्या' लाखांचे बक्षीस

सोळा संघांचा समावेश

पंधराव्या हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत एकून 16 संघ सामील होणार असून सर्व संघ भारतात पोहोचले आहेत. या संघांची साखळी फेरीसाठी 4 ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

स्पर्धेची रचना अशी आहे की साखळी फेरीनंतर प्रत्येक ग्रुपमधील अव्वल क्रमांकाचा संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ क्रॉसओव्हर फेरीत खेळतील. यातील विजयी 4 संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील.

त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवणारे संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीतील विजयी संघ अंतिम सामन्यात विश्वविजेतेपदासाठी एकमेकांना आव्हान देतील. तर पराभूत झालेले संघ कांस्य पदकासाठी एकमेकांचा सामना करतील.

या स्पर्धेसाठी भारताचा 18 जणांचा संघ जाहीर झाला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग आणि उपकर्णधारपद अमित रोहिदास सांभाळणार आहेत.

(Know the details about Hockey World Cup 2023 which start from 13th January)

असे आहे भारतीय संघाचे साखळी फेरीचे वेळापत्रक

13 जानेवारी - भारत विरुद्ध स्पेन, संध्या. 7 वाजता.

15 जानेवारी - भारत विरुद्ध इंग्लंड, संध्या. 7 वाजता

19 जानेवारी - भारत विरुद्ध वेल्स, संध्या. 7 वाजता

हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ -

गोलकिपर - कृष्णा पाठक, आर श्रीजेश

डिफेंडर - जरमनप्रीत सिंग, सुरिंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), निलम संजीप जेस

मिडफिल्डर - मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग

फॉरवर्ड - मनदीप सिंग, ललितकुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजीत सिंग

राखीव खेळाडू - राजकुमार पाल, जुगराज सिंग

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com