राहुल द्रविड विराट कोहली च्या निशाण्यावर

कसोटी सामण्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली प्रशिक्षक द्रविडला मागे टाकू शकतो
राहुल द्रविड विराट कोहली च्या निशाण्यावर
Virat KohliDainik Gomantak

भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहली हा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात विराट कोहली पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच झालेला पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता, तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने (South Africa)जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती. परंतू आता जो संघ तिसरा निर्णायक सामना जिंकेल तो संघ ट्रॉफी जिंकेल.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा केपटाऊन येथील कसोटीत पुनरागमन करणार आहे. या सामन्यात त्याची नजर एका खास विक्रमावर असेल. प्रशिक्षक राहुल द्रविडला याने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारतासाठी सर्वाधिक धावा काढल्या. आता या सामण्यात विराट कोहली प्रशिक्षक राहुल द्रविडला (rahul dravid)मागे टाकू शकतो. कोहलीने गेल्या दोन वर्षांत एकही शतक झळकावलेले नाही. 2019 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या (bangladesh)शतकानंतर त्याचे चाहते शतकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे त्याला त्याचे पुनरागमन स्मरणीय बनवायचे आहे.

Virat Kohli
शेन वॉर्नच्या ऑल टाइम टॉप 10 वेगवान गोलंदाजामध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही

द्रविडचा रेकॅार्ड तोडू शकतो कोहली

कसोटी सामण्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली (virat kohli)प्रशिक्षक द्रविडला मागे टाकू शकतो. आतापर्यंत त्याने 6 कसोटी सामन्यांमध्ये 2 शतके आणि अर्धशतकांसह 611 धावा केल्या आहेत. द्रविडने 624 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. 14 धावांसह कोहली द्रविडला मागे टाकणार.

Virat Kohli
केपटाऊनमध्ये 'जलवा' दाखवणारे भारतीय गोलंदाज माहितीये?

सध्या सर्वाधिक धावा या सचिन तेंडुलकरच्या (sachin tendulkar) नावावर असून, त्याने 5 शतके आणि 3 अर्धशतकांच्या जोरावर 1161 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गज खेळाडूणे भारताविरुद्ध त्याच मैदानावर ९७४ धावा केल्या आहेत आणि सचिननंतर तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने 704 असून द्रविडने 624 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com