कोलकतासमोर दिल्ली तर हैदराबादसमोर पंजाबचे आज प्रबळ आव्हान

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

दिल्लीस फलंदाजांच्या अपयशाचा पंजाबविरुद्ध फटका बसला होता. शिखर धवनला पृथ्वी शॉची साथ लाभत नाही ही दिल्लीची खंत आहे. दुखापतीतून सावरत असलेला श्रेयस अय्यर, रिषभ पंतचाही सूर काहीसा हरपला आहे.  खराब सुरुवातीनंतर पंजाबने मुंबई, दिल्ली, बंगळूरला पराजित केले आहे.

दुबई- बंगळूरविरुद्धच्या एकतर्फी पराभवातून सावरण्यापूर्वीच कोलकता नाईट रायडर्सची बलाढ्य दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध उद्या लढत होईल. सनरायजर्स हैदराबाद आव्हान राखण्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबची गणिते बिघडवण्याचा प्रयत्न करेल. दिल्लीस फलंदाजांच्या अपयशाचा पंजाबविरुद्ध फटका बसला होता. शिखर धवनला पृथ्वी शॉची साथ लाभत नाही ही दिल्लीची खंत आहे. दुखापतीतून सावरत असलेला श्रेयस अय्यर, रिषभ पंतचाही सूर काहीसा हरपला आहे.  खराब सुरुवातीनंतर पंजाबने मुंबई, दिल्ली, बंगळूरला पराजित केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक याने संघाची मोट उत्तम रितीने बांधल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गोलंदाजी, फलंदाजी आणि आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर संघ परिपूर्ण झाला आहे. संघातील दोन तीन नावे सोडता जवळपास सर्वच खेळाडू नवोदित आहेत याचा पूर्ण लाभ संघाला मिळतो. मात्र, सर्वच खेळाडू युवा असल्याने काही सामन्यांमध्ये संयमाच्या अभावामुळे त्यांना काही सामने गमवाव्याही लागल्या आहेत. दुसरीकडे कलकत्याच्या संघाचा अचानक सूर हरपला की काय, असे दिसून येत आहे. दिनेश कार्तिक याने कर्णधारपद सोडल्यामुळे मॉर्गनला कर्णधारपद हाती घ्यावे  लागले मात्र,त्यालाही संघ विजयी मार्गावर आणण्यासाठी अद्याप अपयशच आले आहे. 
 

संबंधित बातम्या