प्रमोशन-डिमोशन सोडा, 'या' दोन खेळाडूंना BCCI ने दिला मोठा झटका

कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) यांना बीसीसीआयने कोणत्याच श्रेणीत स्थान दिलेले नाही.
Kuldeep Yadav And Navdeep Saini
Kuldeep Yadav And Navdeep Saini Dainik Gomantak

बीसीसीआयने पुढील वर्षासाठी खेळाडूंसोबतचा वार्षिक करार जाहीर केला आहे. यामध्ये असे दोन खेळाडू आहेत, ज्यांना मोठा धक्का बसला आहे. कुलदीप यादव आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) यांना बीसीसीआयने (BCCI) कोणत्याच श्रेणीत स्थान दिलेले नाही. दोन्ही खेळाडूंसाठी ही अत्यंत निराशाजनक बातमी आहे. कुलदीप यादवसाठी (Kuldeep Yadav) मागील काही काळ चांगला गेलेला नाही. नुकताच तो संघात परतला होता. (Kuldeep Yadav And Navdeep Saini Have Not Been Given A Place In Any Category By The BCCI)

दरम्यान, चार कॅटेगिरीमध्ये वर्गवारी करुन बीसीसीआयने एकूण 27 खेळाडूंसोबत हा करार केला आहे. गेल्या वर्षी त्यात एकूण 28 खेळाडूंचा समावेश होता. गेल्या वर्षीच्या करारात हे दोन्ही खेळाडू सी श्रेणीत होते. अर्थातच या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयकडून दरवर्षी एक कोटी रुपये मिळत होते, जे आता मिळणार नाहीत. मागील कराराच्या सी श्रेणीमध्ये बीसीसीआयने 10 खेळाडूंना स्थान देण्यात आले होते, मात्र यावेळी 12 खेळाडूंना या श्रेणीत स्थान मिळाले आहे.

Kuldeep Yadav And Navdeep Saini
BCCI Contracts: अजिंक्य रहाणे-चेतेश्वर पुजारा अन् हार्दिक पांड्याला A ग्रेडमधून डिस्चार्ज

तसेच, बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून बाहेर पडण्याचा अर्थ स्पष्ट आहे, आता या खेळाडूंना दरवर्षी मिळणारी रक्कम मिळणार नाही.

कोणत्या खेळाडूंना हा नवीन करार मिळाला

A+ कॅटेगिरी (7 कोटी वार्षिक): विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह

A कॅटेगिरी (5 कोटी): अश्विन, रवींद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद शमी, ऋषभ पंत

B कॅटेगिरी (3 कोटी): चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा

C कॅटेगिरी (वार्षिक 1 कोटी): शिखर धवन, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, युझवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, वृद्धिमान साहा आणि मयंक अग्रवाल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com