
Kuldeep Yadav Video, IND vs SL 2nd ODI: कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना चांगलाच त्रास दिला. टीम इंडियाने मालिकेतील दुसऱ्या वनडेत श्रीलंकेचा डाव 215 धावांत गुंडाळला. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने दमदार कामगिरी केली. त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही अप्रतिम गोलंदाजी केली.
ईडन गार्डन्स मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा संघ 39.4 षटकात 215 धावांवर सर्वबाद झाला. चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 10 षटकात 51 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 5.4 षटके टाकली आणि 30 धावांत 3 बळी घेतले. युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने 2 तर अष्टपैलू अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.
फिरकीपटू कुलदीप यादवने या सामन्यात 3 विकेट घेतल्याने श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाकाला आऊट करणे खूप खास होते. संघाच्या 4 विकेट पडल्यानंतर क्रीझवर आलेल्या शनाकाने त्याला जे माहीत आहे, ते करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्वीप शॉट. लेगस्टंपवर येणारा चेंडू शनाकाने स्वीप करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मात्र तो बाद झाला.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) प्रतिनिधित्व करणाऱ्या कुलदीपने या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने 51 धावांत तीन महत्त्वाचे बळी घेतले. कुलदीपने कुसल मेंडिस, चरित अस्लंका आणि कर्णधार दसुन शनाका यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. श्रीलंकेचे 6 विकेट अवघ्या 126 धावांवर पडणे हे कुलदीपच्या गोलंदाजीचे आश्चर्य होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.