गोव्यात बॉक्सिंग साधनसुविधेचा अभाव

पेडे-म्हापसा येथे राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा
गोव्यात बॉक्सिंग साधनसुविधेचा अभाव
Lack of boxing facilities in GoaDainik Gomantak

पर्वरी: गोव्यात बॉक्सिंग (Goa Boxing) खेळाची गुणवत्ता आहे, पण उत्तम साधनसुविधेचा अभाव असून त्याच्या निर्मितीची गरज आहे. गावागावातून तयार होणाऱ्या बॉक्सरना मदतीची आवश्यकता आहे, जेणेकरून ते पदके जिंकू शकतील, असे प्रतिपादन गोवा हौशी बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी केले.

Lack of boxing facilities in Goa
गोव्याची भक्ती ‘अर्जुन’ पुरस्काराची दावेदार

गोवा हौशी बॉक्सिंग संघटनेची अखिल गोवा पातळीवरील बॉक्सिंग स्पर्धा येत्या आठ व नऊ ऑक्टोबर रोजी पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियममध्ये होईल. सात ऑक्टोबरला खेळाडूंची नोंदणी, दस्तऐवजी तपासणी होऊन संध्याकाळी ड्रॉ निश्चित केला जाईल. या स्पर्धेची माहिती आंदार खंवटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संघटनेच्या सचिव दानुष्का दा गामा, सचिव निनिल डिसोझा, खजिनदार हेमंत नागवेकर उपस्थित होते.

गोव्यातील बॉक्सरनी राष्ट्रीय स्पर्धेत पदके जिंकली आहे. अनेक बॉक्सर सैन्यात भरती झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात या खेळास मदतीची आवश्यकता आहे, असे मत आमदार खंवटे यांनी व्यक्त केले. कोविड-19 महामारीमुळे सुमारे दोन वर्षे राज्यातील क्रीडा क्षेत्र ठप्पा झाले. आता ते खुले होत असून क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. राज्य सरकार व क्रीडा खात्याकडून बॉक्सिंग खेळास पाठबळ अपेक्षित असून संघटनेचे थकलेले अनुदान मिळवून द्यावे, अशी मागणी आमदार खंवटे यांनी केली. संघटनेचे राज्य सरकारकडून अपेक्षित असलेले थकित अनुदान देण्यास दिरंगाई झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Lack of boxing facilities in Goa
मुख्यमंत्री चषक स्पर्धेला 30 ऑक्टोंबर पासून सुरवात

चार गटात स्पर्धा

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा सबज्युनयर, ज्युनियर, यूथ व एलिट पुरुष-महिला गटात होणार आहे. यावर्षीही स्पर्धेत एआयबीए प्रमाणबद्ध संगणकीय प्रणालीद्वारे गुणांकन केले जाईल, जी मुंबई येथून मागविण्यात आली आहे. सरावप्राप्त आणि परीक्षेत उत्तीर्ण झालेले गोव्यातील रेफरी स्पर्धेत पंचगिरी करतील.

Related Stories

No stories found.