Lasith Malinga: श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा T20 क्रिकेटमधून निवृत्त

कसोटी आणि वनडेमधून अगोदरच झाला होता निवृत्त
Lasith Malinga: श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा T20 क्रिकेटमधून निवृत्त
Lasith MalingaDainik Gomantak

श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज Lasith Malinga ने टी -20 क्रिकेटमधून निवृत्ती (Lasith Malinga retirement in T20 Cricket) जाहीर केली आहे. मलिंगाने यापूर्वीच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मलिंगा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) खेळला आहे आणि या लीगमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम (IPL Top Wicket Taker Lasith Malinga) त्याच्या नावावर आहे. यॉर्कर आणि संथ गतीची (Yorker King) गोलंदाजी करण्यात माहिर असलेला मलिंगा कधीकधी आपल्या फलंदाजीने सुद्धा विरोधी संघाला आश्चर्यचकित करायचा.

Lasith Malinga
BCCI: भारतीय महिला क्रिकेटपटूंचे ऑस्ट्रेलियामध्ये प्रशिक्षण सुरू

आपल्या निवृत्तीची घोषणा करताना मलिंगा म्हणाला, "आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 जबरदस्त वर्षानंतर, मला विश्वास आहे की मला आवडणाऱ्या खेळासाठी मी सर्वोत्तम करू शकतो ते म्हणजे पुढच्या पिढीसोबत काम करणे, तुमचे अनुभव शेअर करणे. या खेळात उदयास येण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तरुण पिढीला मी पाठिंबा आणि मार्गदर्शन करत राहीन आणि खेळावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या सोबत मी नेहमीच राहीन," असे मलिंगा म्हणाला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com