बंगळूर आणि हैदराबादसाठी डू ऑर डाय..!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

सलग चार पराभवानंतरही बाद फेरीत स्थान मिळवलेला बंगळूरचा संघ आणि सलग तीन विजयाने थाटात प्लेऑफ गाठणारा हैदराबादचा संघ यांच्या उद्या आयपीएलच्या ‘एलिमिनेटर’चा सामना होत आहे. पराभूत होणारा संघाचे आव्हान संपुष्टात येणार असल्याने दडपणाचा समर्थपणे सामना करणाऱ्या संघाला अधिक संधी असेल.

अबुधाबी :  सलग चार पराभवानंतरही बाद फेरीत स्थान मिळवलेला बंगळूरचा संघ आणि सलग तीन विजयाने थाटात प्लेऑफ गाठणारा हैदराबादचा संघ यांच्या उद्या आयपीएलच्या ‘एलिमिनेटर’चा सामना होत आहे. पराभूत होणारा संघाचे आव्हान संपुष्टात येणार असल्याने दडपणाचा समर्थपणे सामना करणाऱ्या संघाला अधिक संधी असेल.

मुंबई इंडियन्सचा अपवाद वगळता प्लेऑफचे संघ निश्‍चित होताना अनेक घडामोडी घडल्या. हैदराबादचा संघ सर्वात शेवटी पात्र ठरला; परंतु या संघाने अगोदर पात्र ठरलेल्या मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि बंगळूर संघालाही पराभवाचा धक्का दिलेला आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार हैदराबादचे पारडे जड असेल, मात्र उद्या प्रत्यक्ष खेळ कसा केला जातो यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून 
असेल.
हैदराबादकडे डेव्हिड वॉर्नर, केन विलियमसन, रशिद खान आणि जेसन होल्डर यांचा अपवाद वगळता प्रभावशाली खेळाडू नाही, परंतु संघ म्हणून ते एकत्रित कामगिरी करत असल्याने बलाढ्य संघांना पराभवाचा धक्का देण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली आहे. त्यांची हीच क्षमता उद्या बंगळूरसाठी धोक्‍याची ठरू 
शकते. 
अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईला १४९ धावांत रोखल्यावर हैदराबादने एकही विकेट न गमावता मिळवलेला विजय नाबाद फलंदाज वॉर्नर-साहाबरोबर इतर खेळाडूंचाही आत्मविश्‍वास वाढवणारा ठरणारा आहे; तर दुसऱ्या बाजूला बंगळूरने आपला अखेरचा दिल्लीविरुद्धचा साखळी सामना गमावला होता, परंतु कर्णधार विराट कोहली कोणत्याही परिस्थितीत संघाचे मनोबल उंचावण्यास सक्षम आहे. त्यामुळे अगोदर काय झाले यापेक्षा प्रत्यक्ष सामन्यात कसा खेळ होईल यावर भवितव्य अवलंबून असेल. 

संबंधित बातम्या