आज राजस्थान रॅायल्सची शेवटची संधी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

सुरुवातीला अडळखणाऱ्या परंतु त्यानंतर सलग पाच विजय मिळवून कमालीची प्रगती करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबला प्लेऑफमधील दावेदारी अधिक प्रबळ करण्याची संधी उद्या मिळणार आहे,

अबुधाबी :  सुरुवातीला अडळखणाऱ्या परंतु त्यानंतर सलग पाच विजय मिळवून कमालीची प्रगती करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबला प्लेऑफमधील दावेदारी अधिक प्रबळ करण्याची संधी उद्या मिळणार आहे, परंतु त्यासाठी राजस्थानचा अडसर दूर करावा लागणार आहे.
पंजाबचे १२ सामन्यांतून १२ गुण झाले आहेत; तर राजस्थान १२ सामन्यांतून १० गुणांवर आहेत. उद्याचा सामना गमावला तर राजस्थानचे आव्हान संपुष्टात येईल.

पंजाबसाठी मात्र सर्व आशा संपलेल्या नसतील, त्यामुळे दोघांसाठी हा उपांत्यपूर्व फेरीसारखा सामना आहे.ख्रिस गेल संघात परतल्यावर पंजाब संघाचे दैव बदलले आहे. त्यांनी गुणतक्‍त्यात पहिल्या तीन स्थानांवर असलेल्या मुंबई, दिल्ली, बंगळूर या मात्तबर संघांना पराभूत केले, त्यामुळे आता आपण कोणालाही पराभूत करू शकतो हा आत्मविश्‍वास त्यांना मिळाला आहे.

केएल राहुल आणि मयांक अगरवाल यांच्यावरचे दडपण गेलने कमी केले आहे, त्यातच अगरवालच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या मनदीप सिंगने मॅचविनिंग खेळी केली होती, त्यामुळे पंजाबची फलंदाजी आता मजबूत झाली आहे. उद्या मात्र त्यांना राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा सावधपणे सामना करावा लागेल. राजस्थाननेही त्यांच्या गेल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. बेन स्टोक्‍सने शतक करून फॉर्म मिळवला होता. आता स्टोक्‍ससह स्टीव स्मिथ, जॉस बटलर असे तीन खंदे फलंदाज राजस्थानकडे आहेत

संबंधित बातम्या