Indian Super league 2021मध्ये यंदा `Late Night` सामने

Indian Super league 2021: सर्व लढती गोव्यात; पहिला सामना 19 नोव्हेबरला
Indian Super league 2021मध्ये यंदा `Late Night` सामने
Indian Super league 2021Dainik Gomantak

पणजी: इंडियन सुपर लीग फुटबॉल (Indian Super league 2021) स्पर्धेत यंदा प्रथमच रात्री उशिरा फुटबॉल लढती रंगणार आहेत. शनिवारी `Double Header`च्या दिवशी दुसरी लढत रात्री साडेनऊ वाजता खेळली जाईल.

स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेडने (FSDL) सोमवारी 2021-22 मोसमातील पहिल्या अकरा फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले. गतमोसमाप्रमाणेच यंदाही संपूर्ण स्पर्धा गोव्यातील (Goa) तीन स्टेडियमवर खेळली जाईल. स्पर्धेतील पहिला सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. पहिल्या टप्प्यातील अखेरचा सामना नऊ जानेवारीस होईल. बाकी लढती वेळापत्रक डिसेंबर महिन्यात जाहीर केले जाईल.

Indian Super league 2021
BCCI 'विराट' निर्णय घेणार? कर्णधारपदाची माळ पडणार रोहितच्या गळ्यात

गतमोसमाप्रमाणेच स्पर्धेत एकूण 115 सामने असतील. लढती फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम (P. Jawaharlal Nehru Stadium Fatorda), बांबोळी येथील जीएमसी स्टेडियम (GMC Stadium) व वास्को येथील टिळक मैदानावर (Tilak Ground, Vasco) होतील. शनिवारची लेट नाईट लढत वगळता बाकी सामने संध्याकाळी साडेसात वाजता होतील. पहिली लेट नाईट लढत 27 नोव्हेंबरला गतविजेता मुंबई सिटी एफसी (Mumbai City FC) व हैदराबाद एफसी (Hyderabad FC) यांच्यात फातोर्डा येथे खेळली जाईल.

गतउपविजेते एटीके मोहन बागान (ATK Mohan Bagan) व केरळा ब्लास्टर्स (Kerala Blasters) यांच्यात फातोर्डा येथे यंदाचा पहिला सामना 19 नोव्हेंबरला खेळला जाईल. गतविजेत्या मुंबई सिटीची स्पर्धेतील मोहीम 22 नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यांची पहिली लढत एफसी गोवा संघाविरुद्ध होईल. ईस्ट बंगाल (E. Bengal) व एटीके मोहन बागान यांच्यातील कोलकाता डर्बी (Kolkata Derby) 27 नोव्हेंबरला वास्को येथे खेळली जाईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com