गोवा फुटबॉलचे ज्येष्ठ उपाध्यक्ष लव्हिनियो रिबेलो यांचे निधन

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 9 मे 2021

गोवा फुटबॉल असोसिएशनचे (जीएफए) ज्येष्ठ उपाध्यक्ष, राज्यातील फुटबॉलमधील दीर्घानुभवी फुटबॉल प्रशासक लव्हिनियो रिबेलो यांचे शनिवारी रात्री उशिरा कोविड-19 संसर्गामुळे इस्पितळात निधन झाले.

पणजी: गोवा(Goa) फुटबॉल असोसिएशनचे (GFA) ज्येष्ठ उपाध्यक्ष, राज्यातील फुटबॉलमधील(Football) दीर्घानुभवी फुटबॉल प्रशासक लव्हिनियो रिबेलो(Lavinio Rebello) यांचे शनिवारी रात्री उशिरा कोविड-19(Covid-19) संसर्गामुळे इस्पितळात निधन झाले.(Lavinio, senior vice president of Goa football has passed away)

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवरील फुटबॉल स्पर्धा आयोजनात नेहमीच अग्रेसर राहणारे लव्हिनियो सुमारे दोन दशके राज्यातील फुटबॉल प्रशासनात सातत्याने सक्रिय होते. मृत्यूसमयी ते 54 वर्षांचे होते. ते बार्देश तालुक्यातील हणजुण येथील रहिवासी होते.

गोव्यातील लेव्हल वन क्रिकेट प्रशिक्षकांची संख्या वाढणार

जीएफएच्या सध्याच्या व्यवस्थापकीय समितीत ते उत्तर विभागाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या अकाली निधनाबद्दल गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आमदार चर्चिल आलेमाव यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. फुटबॉलप्रती समर्पित असलेला सच्चा मित्र गमावला आहे, अशी प्रतिक्रिया आलेमाव यांनी दिली. कोविड-19 मुळे वर्षभरात मृत्यूमुखी पडलेले लव्हिनियो हे जीएफएचे दुसरे पदाधिकारी होते.

या प्रसंगी दिल्लीच्या फुटबॉलअसोशिएशनचे अध्यक्ष शाजी प्रभाकरण यांनी शोक व्यक्त केला आहे. "मी त्यांच्या परिवाराबद्दल, त्यांच्या प्रिय व्यक्तींबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो, गोवा फुटबॉलमध्ये (GFA) मध्ये त्यांनी  मोलाचे योगदान दिले आहे . मी त्यांना वैयक्तिकरित्या गेल्या 16 वर्षापासून ओळखतो. त्यांच्या जाण्याने फुटबॉल संघाचे चे मोठे नुकसान झाले त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली असे ट्विट त्यांनी केले आहे.

AFC Champions League: एफसी गोवाच्या नवोदितांची छाप; प्रशिक्षक आनंदित

संबंधित बातम्या