Usain Bolt: एका झटक्यात उसेन बोल्ट झाला कंगाल, खात्यात उरले फक्त 12 हजार डॉलर्स

Financial Scam with Legend Athlete: आर्थिक घोटाळ्यात कधी-कधी सर्वसामान्य जनताही भरडली जाते, तर कधी मोठ्या व्यक्तींवरही चोर हात साफ करतात.
Usain Bolt
Usain BoltDainik Gomantak

Financial Scam with Legend Athlete: आर्थिक घोटाळ्यात कधी-कधी सर्वसामान्य जनताही भरडली जाते, तर कधी मोठ्या व्यक्तींवरही चोर हात साफ करतात. असाच प्रकार एका दिग्गज खेळाडूसोबत घडला आहे. या खेळाडूच्या बँक खात्यातून कोटींची रक्कम गायब झाली आहे. आता त्याच्या खात्यात फक्त 12 हजार डॉलर्स शिल्लक आहेत.

97 कोटी रुपये गायब झाले

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात फसवणूक कोणाचीही होऊ शकते. जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीसोबत फसवणूक होते तेव्हा प्रत्येकजण आश्चर्याने पाहतो. एका दिग्गज खेळाडूसोबत अशीच घटना घडली. त्याच्या बँक खात्यातून तब्बल 80 टक्के रक्कम गायब झाली. हे सर्व जमैकाचा धावपटू उसेन बोल्टसोबत (Usain Bolt) घडले. घोटाळेबाजांनी त्याच्या खात्यातून $12 दशलक्ष (सुमारे 97 कोटी रुपये) चोरले आहेत.

Usain Bolt
India vs New Zealand: दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियात मोठा बदल? अशी असेल Playing XI

बोल्टच्या वकिलांनी याची पुष्टी केली

36 वर्षीय उसेन बोल्टने किंग्स्टनच्या स्टॉक्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड या गुंतवणूक फर्ममधील त्याच्या खात्यातील लाखो डॉलर्स गमावले आहेत. ट्रॅक आणि फील्ड स्टारच्या वकिलांचे म्हणणे आहे की, जमैकन गुंतवणूक फर्ममधील त्याच्या खात्यातून $12 दशलक्ष गायब झाले. गरज पडल्यास आम्ही हे प्रकरण न्यायालयात (Court) नेण्यास तयार आहोत. आता खात्यात फक्त 12 हजार डॉलर्स (सुमारे 9 लाख रुपये) शिल्लक आहेत.

न्यायालयात जाण्याची तयारी

बोल्टच्या वकिलाने या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली आहे. लिंटन पी. गॉर्डन यांनी फॉर्च्यून मासिकाला सांगितले की, 'बोल्टची निवृत्ती आणि त्याच्या आयुष्यभराच्या बचतीचा काही भाग या खात्यात होता. ही कोणासाठीही दु:खद बातमी आहे. पेन्शनचा भाग म्हणून त्याने हे खाते उघडले होते. कंपनीने निधी परत न केल्यास याप्रकरणी आम्ही न्यायालयात जाऊ. बोल्टला त्याचे पैसे परत मिळतील, अशा प्रकारे हे प्रकरण निकाली निघेल अशी अपेक्षा आहे.

Usain Bolt
Team India: T20 संघात रोहित अन् विराटची निवड होणार नाही, रिपोर्टमधून आले समोर

पूर्व कर्मचाऱ्यावर संशय

महान अॅथलीट उसेन बोल्टने 8 ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली आहेत. किंग्स्टनच्या स्टॉक्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड (SSL) ने 12 जानेवारी रोजी सांगितले की, त्याला एका पूर्व कर्मचाऱ्याने (Employees) केलेल्या फसवणुकीबद्दल माहिती मिळाली आहे. SSL ने प्रकरण लॉ प्रवर्तनाकडे पाठवले. या कथित फसवणुकीचा तपास सुरु आहे. याच कर्मचाऱ्याने बोल्टच्या खात्यातून पैसे काढल्याचा दावा केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com