गोव्यात रणजी लढतीची शक्यता अंधूक

किशोर पेटकर
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

कोरोनामुळे प्रवास टाळण्यासाठी ठराविक केंद्रावर लढती अपेक्षित

पणजी

कोरोना विषाणू महामारीमुळे २०२०-२१ मोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जास्तप्रमाणात प्रवास टाळत केवळ ठराविक शहरांतच खेळविण्याचे नियोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आखत आहेतसे झाल्यास गोव्यात यंदा रणजी स्पर्धेतील सामना होण्याची शक्यता अंधूक असेल. 

रणजी करंडक स्पर्धेतील सामने एक किंवा दोन शहरात खेळविण्याचे निश्चित झाल्यास गोव्यात एकही रणजी सामना होणार नाही हे पक्के आहे. गोव्यात जास्त क्रिकेट मैदानांची कमतरता असल्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनला यजमान मिळू शकणार नाही हे स्पष्टच आहे. बीसीसीआयने आगामी देशांतर्गत क्रिकेट नियोजनावर शिक्कामोर्तब केल्यास केवळ दुसऱ्यांदा गोव्यात एकही रणजी सामना खेळला जाणार नाही.

बीसीसीआयने स्थानिक स्पर्धा नियोजित वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केलेली नाही. प्रसिद्ध वृत्तानुसाररणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ३८ संघ गटसाखळी पद्धतीने खेळण्याचे संकेत आहेत. सीनियर पातळीवर यंदा दोनच स्पर्धा होतील. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्येतर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा डिसेंबर ते मार्च या कालावधीत होईल. रणजी स्पर्धेतील संघ अई अशा पाच गटात विभागले जातील.

 यापूर्वी फक्त एकदाच...

गोव्याने १९८५-८६ मोसमापासून रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास सुरवात केली. तेव्हापासून फक्त एकदाच गोव्यात एकही रणजी करंडक सामना झालेला नाही. २०१६-१७ मोसमात बीसीसीआयने रणजी क्रिकेट सामने तटस्थ केंद्रांवर खेळविण्याचे धोरण आखले. त्यामुळे गोव्याला त्या मोसमात सर्व ९ सामने बाहेरगावी खेळावे लागले. त्या मोसमात इतर संघांचे सामनेही गोव्यात झाले नव्हते. गतमोसमापर्यंत गोवा रणजी स्पर्धेत २०२ सामने खेळला असून त्यापैकी ८९ सामने होम मैदानावरतर ११३ सामने अवे मैदानावर आहेत. गतमोसमात प्लेट गटात गोव्याचा संघ ५ सामने घरच्या मैदानावर खेळला होता.

 रणजी स्पर्धेच्या गटसाखळीत गोवा

- २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीत क गटातील ४१ पैकी ७ सामन्यांत विजय८ पराभव२६ अनिर्णित

- २०१७-१८ मध्ये ड गटात स्थान६ सामन्यांत ४ पराभव२ अनिर्णित

- २०१८-१९ मोसमात क गटातील ९ सामन्यांत ७ पराभव २ अनिर्णित

- एकूण ८ मोसमात ५६ सामने७ विजय१९ पराभव३० अनिर्णित

- गोवा १९८५-८६ ते २००१-०२ कालावधीत दक्षिण विभागाततर २००२-०३ ते २०११-१२ कालावधीत आणि २०१९-२० मोसमात प्लेट गटात

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या