भारतीय महिला क्रिकेट संघाला पुरुष संघ देणार धडे

दैनिक गोमंतक
बुधवार, 2 जून 2021

संघात अनेक युवा खेळडू आहेत ज्या पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहेत. त्यामुळे युवा महिला पुरुष संघातील खेळाडूंची मदत घेऊ शकतात.

मुंबई : भारतीय महिला (Indian Women Cricket) आणि पुरुषांचा क्रिकेट संघ (Indian Man Cricket) आज इंग्लंडसाठी (England) रवाना होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड विरोधात 16 जूनपासून कसोटी सामना सुरु होईल. भारतीय महिला तब्बल 7 वर्षांनंतर कसोटी सामना खेळणार आहेत. त्यामुळे इंग्लंड महिलांना त्यांच्याच मैदानावर धूळ चारण्यासाठी भारतीय महिला संघाला भारताचा पुरुष संघ धडे देणार आहे.

याबाबत बोलताना मिताली राज म्हणाली, संघात अनेक युवा खेळडू आहेत ज्या पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहेत. त्यामुळे युवा महिला पुरुष संघातील खेळाडूंची मदत घेऊ शकतात. पुरुष संघाचा या दौऱ्याचा अनुभव जर युवा महिलांनी जाणून घेतला तर याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. 

भारतीय खेळाडूंच्या कुटुंबियांनाही इंग्लंड दौऱ्यासाठी परवानगी

कसोटी क्रिकेट खेळणे खूप चांगले आहे. मग ते कोठेही असो, यातून खेळाडूंना खूप मदत होते. मैदानात जाऊन कोणत्याही दबावाशिवाय खेळणे आणि परिस्थितीचा आनंद घेणे महत्त्वाचे असते. पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी सामने खेळण्यास मिळणार आहेत. यातून युवा खेळाडूंना खूप शिकण्यास मिळू शकते. झुलनला खेळण्याची संधी मिळणे महत्त्वाचे आहे. तीने मैदानात घालवेल आधीकाधीक वेळ घालविणे महत्त्वाचे आहे. असे मितालीने स्पष्ट केले. 
 

संबंधित बातम्या