Watch Video: डोळ्यांचे पारणे फेडणारा लाईट शो, रायपूर स्टेडियमवरचं अप्रतिम दृष्य

रायपूर वनडेत भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर स्टेडियममध्ये लाइट शोचे आयोजन करण्यात आले होते.
Watch Video
Watch VideoDainik Gomantak

ind vs nz 2nd Odi Raipur Stadium: टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला आहे. कॅप्टन रोहित शर्माची 51 धावांची खेळी आणि शुभमन गिलच्या नाबाद 40 धावांच्या बळावर भारताने (India) सहज विजय मिळवला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे.

अवघ्या 109 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियासाठी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) तुफानी इनिंग खेळली. रोहित शर्माने 51 धावा करत सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (21 जानेवारी) रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला.

भारताने (India) सामना जिंकल्यानंतर रायपूरच्या स्टेडियममध्ये लाइट शोचे (Light Show) आयोजन करण्यात आले होते. चाहत्यांनी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या लाईट शोचा भरपूर आनंद लुटला.

त्याचवेळी या लाईट शो दरम्यान स्टेडियममध्ये चक दे ​​इंडिया गाणे ऐकू आले. रायपूरच्या स्टेडियममधील लाइट शोचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 108 धावा केल्या होत्या. तर भारताने 20.1 षटकात 2 बाद 111 धावा करत सामना जिंकला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली.

भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 15 धावांत न्यूझीलंडचे 5 फलंदाज बाद केले. पण त्यानंतर मायकल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनर यांनी थोडाफार संघर्ष केला. त्यामुळे न्यूझीलंडला शंभरी गाठता आली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर ब्रेसवेलने 27 आणि सँटनरने 22 धावांचे योगदान दिले. भारताकडून मोहम्मद शमीने 3, तर वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पांड्याने 2-2 विकेट घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com