Lionel Messi आणि बार्सिलोना एक अविस्मरणीय नातं

मेस्सी आणि बार्सिलोना या दोघांमधील करार जून मध्ये संपुष्ठात आला होता
Lionel Messi will not extend his contract at FC Barcelona
Lionel Messi will not extend his contract at FC BarcelonaDainik Gomantak

लिओनल मेस्सी (Lionel Messi) बार्सिलोना (FC Barcelona) मध्ये थांबणार का तो 17 वर्ष खेळत असलेल्या क्लबला राम-राम ठोकणार या प्रश्नाचं उत्तर अखेर गुरुवारी मिळालं. (Lionel Messi bids adieu to FC Barcelona)

लिओनल मेस्सी ने बार्सिलोना या क्लबमधून आता न खेळायचं निर्णय घेतला आणि स्पॅनिश फुटबॉल फॅन्सची निराशा झाली. 778 सामने खेळत मेस्सी ने बार्सिलोनासाठी 672 गोल्स मारले आणि क्लबला 35 चषक मिळवून दिले आणि अखेर लिओनल मेस्सी आणि बार्सिलोना या नात्याला पूर्णविराम दिला.

मेस्सी आणि बार्सिलोना या दोघांमधील करार जून मध्ये संपुष्ठात आला होता. मेस्सी थांबणार का जाणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. शेवटी गुरुवारी त्यानी स्पेन मध्ये आपला काळ संपला आहे असे कळाले. बार्सिलोना क्लबने दिलेल्या माहितीनुसार, नव्या करारासाठी सर्व बाजूने प्रयत्न करण्यात आले व चर्चा देखील करण्यात आली मात्र त्यातून काहीच निष्कर्ष निघाला नाही. यामुळे अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सी आणि बार्सिलोना, एक अविस्मरणीय प्रवास आता थांबला आहे.

करार पुढे न केल्यामुळे मेस्सी कुठल्या देशात जाऊन कुठल्या क्लबकडून खेळेल याची उत्सुकता लागली आहे. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते मेस्सी बार्सिलोना क्लब नंतर मँचेस्टर सिटी किंवा पीएसजी मधून खेळेल.

Lionel Messi will not extend his contract at FC Barcelona
इंडिया पुन्हा हॉकीच्या प्रेमात

मेस्सी आणि बार्सिलोना एक अविस्मरणीय नातं

ज्या वयात मुलं शाळा आणि अभ्यासाकडे लक्ष देत असतात त्या वयात लिओनल मेस्सी अर्जेंटिनाच्या मधील न्यूएल्स ओल्ड बॉयज क्लब सोबत जोडला गेला.

मेस्सीच्या वडिलांनीच त्याला फुटबॉल खेळायची प्रेरणा दिली होती म्हणूनच तो आज्जी सोबत जात होता. १० वर्षांचा असताना मेस्सीला ‘ग्रोथ हार्मोन डिफिशिएन्सी’हा आजार झाला. ज्या व्यक्तीला हा आजार होतो त्या व्यक्तीची शाररिक वाढ खुंटते. घरची स्थिती फार काही चांगली नसल्याने मेस्सी च्या घरच्यांची चिंता देखील वाढली होती.

दुसऱ्या बाजूला मेस्सी हा आपल्या खेळीमुळं अनेक क्लबच्या नजरेत होता. त्याच्या अप्रतिम खेळीमुळे स्पेनस्थित बार्सिलोना संघाने त्याला क्लबकडून खेळण्याची ऑफर दिली तसेच त्याच्या उपचाराचा सर्व खर्च उचलू अशी ग्वाही ही दिली. अनेक फुटबॉल फॅन्स ला हे माहिती आहे की त्याने बार्सिलोनासोबत टिशू पेपरवर आपला पहिलं कॉन्ट्रेक्ट केला आणि 14 वर्षांचा असताना मेस्सीला बार्सिलोनाची जर्सी घालायला मिळाली.

Lionel Messi will not extend his contract at FC Barcelona
Tokyo Olympics: हॉकीत महिला चंदेरी पदकापासून वंचित, स्पर्धेतील कामगिरीचे सर्व स्थरातून कौतुक

बघता बघता मेस्सी बार्सिलोनाचा स्टार खेळाडू झाला. रोनाल्डिन्हो, शाव्ही, इनिएस्टा सारख्या दिग्ग्ज खेळाडूंबरोबर त्याने बार्सिलोना मध्ये आपलं वेगळं नाव कोरलं. बार्सिलोना म्हणलं की मेस्सीचं नाव घेतलं जातं. आता मात्र या प्रवासाचा शेवट झाला आहे. 35 चषकांपैकी त्याने बार्सिलोनाला ४ चॅम्पिअनस लीग चे किताब, ७ वेळा कोपा डेल रे तसेच १० वेळा ला लिगा जिंकवून दिले.

बार्सिलोनाने मेस्सीच्या 21 वर्षांच्या सोबतीसाठी त्याचे आभार मानले आहेत. एका बाजूला स्पॅनिश फॅन्स जरी नाराज असतील तर दुसऱ्या बाजूला मेस्सी ला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा मिळत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com