FIFA World Cup: ब्राझीलविरुद्ध एकही गोल न करता अर्जेंटिनाला मिळाले विश्वचषकात स्थान

लिओनेल मेस्सीला विश्वचषक (FIFA World Cup) जिंकण्याची पाचवी आणि कदाचित शेवटची संधी मिळाली आहे.
FIFA World Cup: ब्राझीलविरुद्ध एकही गोल न करता अर्जेंटिनाला मिळाले विश्वचषकात स्थान
Lionel Messi could not score goal against Brazil yetArgentina qualified for World Cup Dainik Gomantak

नवी दिल्ली: अर्जेंटिनाने आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी ब्राझील विरुद्ध दक्षिण अमेरिकन विश्वचषक पात्रता सामन्यात गोलशून्य बरोबरी खेळून पुढील वर्षीच्या विश्वचषकात (FIFA World Cup) आपले स्थान निश्चित केले. यासह लिओनेल मेस्सीला (Lionel Messi) विश्वचषक जिंकण्याची पाचवी आणि कदाचित शेवटची संधी मिळाली आहे. मेस्सीने आतापर्यंतच्या कारकिर्दीत एवढी मोठी ट्रॉफी जिंकलेली नव्हती. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इक्वेडोरने चिलीवर 2-0 असा विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या स्थानावर असलेल्या अर्जेंटिनाने कतारमध्ये होणाऱ्या स्पर्धेत पात्रता मिळवली आहे. अर्जेंटिनाचे आता 29 गुण आहेत आणि फक्त चार पात्रता बाकी आहेत, दोनपेक्षा जास्त संघ मेस्सीच्या नेतृत्वाखालील संघाला मागे सोडू शकत नाहीत.

पात्रता गुणतक्त्यात अव्वल स्थानावर असलेल्या ब्राझीलने याआधीच विश्वचषकात धडक मारली आहे. दक्षिण अमेरिकेतील चार संघांना थेट विश्वचषकात प्रवेश मिळतो तर पाचव्या स्थानावर असलेल्या संघाला आंतरखंडीय प्लेऑफमध्ये खेळायला मिळते. ब्राझीलचे 35 गुण आहेत जे अर्जेंटिनापेक्षा सहाने जास्त आहेत. या दोन संघांनी 13 सामने खेळले आहेत जे इतर संघांपेक्षा एकने कमी आहे कारण सप्टेंबरमध्ये त्यांच्यातील सामना कोविड -19चे निर्बंध लागू झाल्यामुळे केवळ सात मिनिटांनंतर पुढे ढकलण्यात आला होता. जागतिक फुटबॉल संघटना फिफाने या सामन्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

Lionel Messi could not score goal against Brazil yetArgentina qualified for World Cup
IND vs NZ: रोहित,राहुल पर्वाला आज पासून सुरूवात

इक्वेडोर 23 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शेवटच्या स्थानावर असलेला संघ व्हेनेझुएला व्यतिरिक्त इतर संघांना पात्र ठरण्याची संधी आहे. कोलंबिया आणि पेरूचे 17 गुण आहेत, तर चिली आणि उरुग्वे 16 गुणांसह सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. बोलिबिया (15 गुण) आणि पॅराग्वे (13 गुण) देखील शर्यतीत कायम आहेत. बोलिव्हियाने उरुग्वेला 3-0 आणि पेरूने व्हेनेझुएला विरुद्ध 2-1 पराभूत केले, तर कोलंबिया आणि पॅराग्वे गोलरहित बरोबरीत सुटले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com