लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनास निरोप?

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

मेस्सीचा बार्सिलोनाबरोबरील करार पुढील मोसमापर्यंत आहे, पण संघातील अंतर्गत घडामोडींनी तो खूपच त्रासला आहे आणि आपण संघाचा निरोप घेत असल्याचे संकेत त्याने संघ व्यवस्थापनास दिले असल्याचेही समजते.

माद्रिद: बार्सिलोनाच्या बायर्न म्युनिचविरुद्धच्या चॅम्पियन्स लीगमधील २-८ पराभवाने लिओनेल मेस्सी कमालीचा निराश झाला आहे. त्याने आता आपण संघाचा निरोप घेत असल्याचे संकेत संघातील सहकाऱ्यांना सांगितले असल्याचे समजते. 

एस्पोर्ते इंटरॅक्‍टिवोचे प्रतिनिधी मार्सेलो बेशलर यांनी नेमार बार्सिलोना सोडून पीएसजीकडे चालला असल्याचे वृत्त ब्रेक केले आहे. त्यांनीच आता मेस्सी बार्सिलोना संघाचा तातडीने निरोप घेण्यास उत्सुक असल्याचे ट्विट केले आहे. मेस्सीचा बार्सिलोनाबरोबरील करार पुढील मोसमापर्यंत आहे, पण संघातील अंतर्गत घडामोडींनी तो खूपच त्रासला आहे आणि आपण संघाचा निरोप घेत असल्याचे संकेत त्याने संघ व्यवस्थापनास दिले असल्याचेही समजते. 

बार्सिलोना आणि मेस्सी यांच्यातील करारात ७० कोटी पौंडचा बायआऊट नियम आहे. त्यानुसार मेस्सीच केवळ आपल्या विक्रीसाठी अर्ज करू शकतो.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या