नाराजी कायम ठेवून मेस्सी बार्सिलोनातच

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

ज्या क्‍लबने मला मोठे केले त्या क्‍लबला मला न्यायालयात न्यायचे नव्हते म्हणून मी येथेच राहाण्याचा निर्णय घेतला आहे, असे मेस्सीने जाहीर केले, मात्र क्‍लब व्यवस्थापन अतिशय सुमार असल्याची जाहीर टीकाही त्याने केली.

बार्सिलोना: फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीने अखेर बार्सिलोनातच राहाण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याची नाराजी कायम राहिली आहे. बार्सिलोनात राहाण्याचा निर्णय जाहीर करताना त्याने क्‍लबच्या व्यवस्थापनावर टीकाही केली. 

ज्या क्‍लबने मला मोठे केले त्या क्‍लबला मला न्यायालयात न्यायचे नव्हते म्हणून मी येथेच राहाण्याचा निर्णय घेतला आहे, असे मेस्सीने जाहीर केले, मात्र क्‍लब व्यवस्थापन अतिशय सुमार असल्याची जाहीर टीकाही त्याने केली. चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोनाचा दारुण पराभव झाल्यानंतर मेस्सीने बार्सिलोना सोडणार याची चर्चा उघडपणे सुरू झाली होती. मॅंचेस्टर सिटी त्याला आपल्या क्‍लबमध्ये घेण्यास उत्सुकही होते; परंतु त्यासाठी ७० कोटी युरो ट्रान्सफर फी द्यावी लागली असती, परंतु ही सर्व घडामोड न्यायालयात गेली असती; परंतु मेस्सीला हे नको होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या