लिओनेल मेस्सी बार्सिलोनाकडेच राहणार; नेमारही परत आल्यास क्‍लबची आर्थिक स्थिती सुधारण्याचा दावा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

 लिओनेल मेस्सी बार्सिलोना संघात कायम राहील; एवढेच नव्हे, तर नेमारही संघात परत येईल, असे बार्सिलोना क्‍लबच्या अध्यक्षपदाचे उमेदवार जॉर्डी फॅरे यांनी सांगितले.

माद्रिद :  लिओनेल मेस्सी बार्सिलोना संघात कायम राहील; एवढेच नव्हे, तर नेमारही संघात परत येईल, असे बार्सिलोना क्‍लबच्या अध्यक्षपदाचे उमेदवार जॉर्डी फॅरे यांनी सांगितले. मेस्सीच्या विरोधात असलेले क्‍लबचे माजी प्रमुख जोसेप मारिया यांच्याविरोधात फॅरे यांनीच जोरदार मोहीम उघडली होती. त्यांनी आपल्याला पाठिंबा देणाऱ्या क्‍लबच्या मतदारांना मोफत टॅटू तसेच पिझ्झा देण्याची ग्वाही दिली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यावर काही दिवसांतच बार्सिलोना आणि मेस्सी यांच्यात नवा करार होणार आहे, असे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर मेस्सीही यासाठी तयार असल्याचा दावा त्यांनी केली. क्‍लबची आर्थिक स्थिती सुधारणे शक्‍य आहे. नेमारला संघात परत आणल्यास क्‍लबची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल, असेही त्यांनी सांगितले. 

अधिक वाचा :

विराटला ऑस्ट्रेलियाबरोबर खुन्नस नको, स्पर्धा हवी  !

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना आज ; भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय 

आयएसएलमध्ये एफसी गोवाला हरवून एटीके मोहन बागान दुसऱ्या स्थानावर 

 

संबंधित बातम्या