लिटल गौर्स लीगमध्ये युवा फुटबॉलपटूंनी दाखवले कौशल्य

लिटल गौर्स लीगमध्ये 744 खेळाडूंचा सहभाग
लिटल गौर्स लीगमध्ये युवा फुटबॉलपटूंनी दाखवले कौशल्य
Football Dainik Gomantak

पणजी: फोर्सा गोवा फाऊंडेशनच्या तिसऱ्या लिटल गौर्स लीग फुटबॉल स्पर्धेत राज्यभरातील युवा फुटबॉलपटूंत उत्साह दिसला. चार वयोगटात 91 संघांतर्फे 744 मुला-मुलींनी सहभाग घेतला. (Little gours football league in goa)

Football
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघातात निधन

माँत द गिरी येथील सेंट अँथनी हायस्कूल मैदानावर झालेल्या या स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. स्पर्धेला पाच मार्च रोजी उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि वास्को विभागात सुरवात झाली होती.

उत्तर गोवा विभागात व्हिंटेज 73 मोरजी संघाने 6 व 8 वर्षांखालील वयोगटात, लर्न टू प्ले फुटबॉल स्कूलने 10 वर्षांखालील वयोगटात, लक्ष्मीप्रसाद स्पोर्टस क्लबने 12 वर्षांखालील मुलींत विजेतेपद मिळविले. दक्षिण गोवा विभागात एफसी वायएफए, व्हूडी फुटबॉल अकादमी व नावेली बॉईज संघाने अनुक्रमे 6, 8 व 10 वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले. व्हूडी फुटबॉल अकादमीने 12 वर्षांखालील मुलींतही बाजी मारली. वास्को विभागात रोझा अकादमी, किरण निकेतन, टायनी गोल्स संघ विजेता ठरला.

Football
Hockey Tournament: विजेतेपदासाठी झारखंडला उत्तर प्रदेशचे आव्हान

व्हालेना फर्नांडिस हिने दक्षिण विभागीय 12 वर्षांखालील मुलींत सर्वाधिक गोल केले. तिला आता एफसी गोवाच्या महिला संघासमवेत सराव करण्याची संधी मिळेल.

लिटल गौर्स लीग स्पर्धेत यंदा सुविधांचा दर्जा वाढविण्यावर भर देण्यात आला, तसेच द्विसाखळी पद्धतीने स्पर्धा घेत मुलांना खेळण्यास जास्त वेळ मिळेल याची दक्षता घेतली. त्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांनाही विकसित होण्याच्या दृष्टीने संधी मिळाली, असे फोर्सा गोवा फाऊंडेशनचे सामाजिक फुटबॉलचे वरिष्ठ व्यवस्थापक नाथानियल डिकॉस्ता यांनी सांगितले. स्पर्धेची चौथी आवृत्ती यावर्षी नोव्हेंबरमध्ये घेतली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. साल्वादोर द मुंद पंचायत मैदानावर येत्या रविवारी (ता. 22) लिटल गौर्स लीग सुपर कप स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेत उत्तर व दक्षिण विभागातील पहिले तीन संघ, तर वास्को विभागातील अव्वल दोन संघ भाग घेतील. ही एकदिवसीय बाद फेरी स्पर्धा असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.