IPL 2023 पूर्वीच लखनऊच्या संघाने घेतला मोठा निर्णय, टीम दिसणार नव्या अवतारात; Video

Lucknow Super Giants: आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. अनेक युवा क्रिकेटपटूंनी इथे खेळून आपली कारकीर्द घडवली आहे.
Lucknow Super Giants
Lucknow Super GiantsDainik Gomantak

Lucknow Super Giants: आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. अनेक युवा क्रिकेटपटूंनी इथे खेळून आपली कारकीर्द घडवली आहे.

आयपीएलमध्ये खेळून खेळाडूंना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळते. आयपीएल 2023 ची सुरुवात 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याने होणार आहे.

त्याचवेळी, लखनऊ सुपर जायंट्स त्यांचा पहिला सामना 1 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे, परंतु आता लखनऊ संघाने आयपीएल 2023 पूर्वी मोठा निर्णय घेतला आहे.

एलएसजीच्या टीमने हे काम केले

आयपीएल सुरु होण्यासाठी काही महिनेच उरले आहेत, मात्र त्याआधी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने आपली नवी जर्सी लाँच केली आहे. आता लखनऊची टीम पूर्णपणे नव्या अवतारात दिसणार आहे.

2022 मध्ये हिरव्या-निळ्या जर्सी परिधान केलेल्या केएल राहुलच्या नेतृत्वाखालील फ्रेंचायझी आता नेव्ही ब्लूमध्ये बदलेल. गेल्यावर्षी, एलएसजीने लखनऊ संघाचा कर्णधार राहुलला 17 कोटींमध्ये खरेदी केले होते.

Lucknow Super Giants
Mumbai Indians: बुमराहनंतर आता 'हा' खेळाडूही IPL 2023 मधून बाहेर! धक्कादायक अपडेट आले समोर

गेल्या हंगामात शानदार कामगिरी

गेल्या मोसमात केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्स संघाने शानदार कामगिरी केली होती. गेल्यावर्षी, लखनऊ सुपर जायंट्स संघाने 16 सामन्यांपैकी 11 सामने जिंकले आणि पात्रता फेरीत प्रवेश केला.

केएल राहुल सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे, पण तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतो. गेल्या मोसमात त्याने लखनऊसाठी 616 धावा केल्या होत्या.

Lucknow Super Giants
IPL 2023: 'मी आगामी आयपीएलमध्ये खेळणार...', बेन स्टोक्सने केले स्पष्ट

IPL 2023 साठी लखनऊ सुपर जायंट्स संघ:

केएल राहुल (कर्णधार), आयुष बडोनी, करण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोइनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा, काइल मेयर्स, कृणाल पंड्या, आवेश खान, मोहसिन खान, मार्क वुड, मयंक यादव, रवी बिश्नोई, निकोल्स पुरन, जयदेव उनाडकट, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, डॅनियल सायम्स, अमित मिश्रा, प्रेरक मांकड, स्वप्नील सिंग, नवीन उल हक, युधवीर चरक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com