IPL 2023: प्लेऑफ सामन्यापूर्वी लखनऊ संघाची मोठी घोषणा, आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच 'हे' घडणार

Lucknow Super Giants: लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे, जो संघाच्या आगामी KKR विरुद्धच्या सामन्यात दिसून येईल.
Lucknow Super Giants
Lucknow Super GiantsDainik Gomantak

Lucknow Super Giants: आयपीएल 2023 आता त्याच्या प्लेऑफ सामन्यांची तयारी करत आहे. गुजरात टायटन्स संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे, तर उर्वरित 3 संघ कोण असतील याबाबत लढाई सुरु आहे.

दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने एक मोठा निर्णय घेतला आहे, जो संघाच्या आगामी KKR विरुद्धच्या सामन्यात दिसून येईल. आयपीएलच्या (IPL) इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे.

लखनऊची मोठी घोषणा

लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) संघ शनिवारी (20 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा त्यांच्या जर्सीचा रंग लाल आणि हिरवा असेल.

मोहन बागान संघाच्या जर्सीसारखी ही जर्सी असणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच लखनऊचा संघ या रंगीत जर्सीमध्ये खेळणार आहे.

Lucknow Super Giants
IPL 2023 Purple Cap: 64 सामन्यांनंतर पर्पल कॅपचा बादशहा कोण? टॉप 5 मध्ये केवळ 1 विदेशी गोलंदाज

संघाच्या मालकाने ही माहिती दिली

लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक शाश्वत गोयंका म्हणाले की, 'ही (मोहन बागान) संस्था नाही. ती खरोखर एक भावना आहे. त्याचा वारसा कोलकाता शहराचे प्रतिनिधित्व करतो.

ते पुढे म्हणाले की, हे लक्षात घेऊनच लखनऊचा संघ ईडन गार्डन्सवर शनिवारी होणाऱ्या KKR विरुद्धच्या सामन्यात लाल आणि हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरेल, असे आम्ही ठरवले आहे. मोहन बागान आणि आपल्या शहराच्या वारशाचा आदर करण्याची ही आमची अनोखी पद्धत आहे.'

Lucknow Super Giants
IPL 2023: गंभीर-रहाणेच्या 'या' यादीत गब्बरची एन्ट्री, लाजिरवाणा रेकॉर्ड केला नावावर!

सामन्याबद्दल ते म्हणाले...

शनिवारी होणाऱ्या या सामन्यात स्थानिक समर्थक आपल्या संघाला साथ देतील अशी लखनऊ संघाला आशा आहे. संघाला प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल.

या सामन्याबद्दल गोयंका म्हणाले की, केवळ मोहन बागानचे चाहतेच नाही तर कोलकातामधील क्रिकेटप्रेमीही आम्हाला साथ देतील अशी आम्हाला आशा आहे. कोलकाता हे आमच्यासाठी दुसरे घर आहे.

अशा परिस्थितीत आम्ही लोकांना आमच्या टीमला जास्तीत जास्त पाठिंबा देण्यास सांगू. लखनऊचा संघ 13 सामन्यांत 7 विजय आणि 5 पराभवांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी संघाला कोलकाताविरुद्धचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com