सुयश, एकनाथची झुंज अपयशी टी-२० लढतीत मध्य प्रदेशची गोव्यावर सहा धावांनी मात

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

गोव्याच्या सुयश प्रभुदेसाई आणि एकनाथ केरकर यांनी शेवटच्या पाच षटकांत तुफानी फलंदाजी केली, तरीही सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ड गटात त्यांची झुंज अखेर अपयशीच ठरली.

पणजी  : गोव्याच्या सुयश प्रभुदेसाई आणि एकनाथ केरकर यांनी शेवटच्या पाच षटकांत तुफानी फलंदाजी केली, तरीही सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ड गटात त्यांची झुंज अखेर अपयशीच ठरली. मध्य प्रदेशने २१४ धावांचे संरक्षण करताना सामना सहा धावांनी निसटता जिंकला.

सामना सोमवारी इंदूर येथील होळकर स्टेडियमवर झाला. मध्य प्रदेशने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर २० षटकांत ३ बाद २१४ धावा केल्या. त्यानंतर गोव्याला ७ बाद २०८ धावांची मजल गाठता आली. दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना होता.

सुयश (नाबाद ४८- २२ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार) व एकनाथ (४५- १८ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) यांनी ६ बाद १२१ वरून गोव्याला विजयाशी आशा दाखविली. त्यांनी सातव्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. सुरेंद्र मालवीय याने टाकलेल्या शेवटच्या षटकात गोव्याला विजयासाठी १५ धावांची गरज होती. एकनाथ अंतिमपूर्व चेंडूवर धावबाद झाला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या गोव्यासाठी अशोक डिंडाने स्वप्नवत सुरवात करून दिली. बंगालच्या या माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाजाने डावातील पहिल्याच षटकात अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर विकेट मिळविल्यामुळे मध्य प्रदेशचा डाव २ बाद ६ धावा असा संकटात सापडला. डिंडाने सलामीवीर अर्पित गौड याला यष्टिरक्षक एकनाथ केरकर याच्याकरवी, तर आवेश खानला कर्णधार अमित वर्मा याच्याकरवी झेलबाद केले.

त्यानंतर सलामीवीर व्यंकटेश अय्यर व अनुभवी रजत पटिदार  यांनी गोव्याच्या गोलंदाजांना निष्रभ करताना १५ षटकांत तिसऱ्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे मध्य प्रदेशला मोठी धावसंख्येसाठी प्रयत्न करणे शक्य झाले. शतकासाठी चार धावा हव्या असताना पटिदार याला दीपराज गावकरने त्रिफळाचीत बाद केले. त्यानंतर व्यंकटेश व कर्णधार पार्थ साहानी यांनी चौथ्या विकेटसाठी ५२ धावांची अभेद्य भागीदारी करून मध्य प्रदेशला दोनशे धावांच्या पार नेले.

संक्षिप्त धावफलक

मध्य प्रदेश : २० षटकांत ३ बाद २१४ (अर्पित गौड ६, व्यंकटेश अय्यर नाबाद ८७- ५२ चेंडू, ११ चौकार, २ षटकार, आवेश खान ०, रजत पटिदार ९६- ५१ चेंडू, १० चौकार, ३ षटकार, पार्थ साहानी नाबाद २०, अशोक डिंडा ४-०-४५-२, लक्षय गर्ग ४-०-५२-०, हेरंब परब ४-०-३७-०, दर्शन मिसाळ २-०-२४-०, दीपराज गावकर ४-०-२२-१, सुयश प्रभुदेसाई १-०-११-०, अमित वर्मा १-०-२०-०) वि. वि. गोवा : २० षटकांत ७ बाद २०८ (अमोघ देसाई २२, आदित्य कौशिक १२, लक्षय गर्ग १५, स्नेहल कवठणकर ३१, अमित वर्मा २, दर्शन मिसाळ १७, सुयश प्रभुदेसाई नाबाद ४८- २२ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार, एकनाथ केरकर ४५- १८ चेंडू, ५ चौकार, २ षटकार, दीपराज गावकर नाबाद १, आवेश खान ४-०-३९-१, कुलदीप सेन ४-०-३४-२, अंकित शर्मा ४-०-३२-२).

 

आकडेवारीत सामना...

- ७ बाद २०८ : गोव्याची टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या, यापूर्वी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी बिहारविरुद्ध विझियानगरम येथे ४ बाद २०२

- ३ बाद २१४ : मध्य प्रदेशची धावसंख्या, गोव्याविरुद्ध प्रतिस्पर्ध्यांनी नोंदविलेली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या, हैदराबादचा ४ बाद २२४ (२९ जानेवारी २०१७, चेन्नई) हा गोव्याविरुद्ध उच्चांक

- ४२२ : गोवा आणि मध्य प्रदेशच्या मिळून दोन्ही डावातील धावा. गोव्याचा समावेश असलेल्या सामन्यात सर्वाधिक

- मध्य प्रदेशची गोव्याविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या. यापूर्वी २७ फेब्रुवारी २०१९ रोजी इंदूर येथेच १९.४ षटकांत ६ बाद १९७ धावा

 

- ७ बाद २०८ : गोव्याची टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या, यापूर्वी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी बिहारविरुद्ध विझियानगरम येथे ४ बाद २०२

- ३ बाद २१४ : मध्य प्रदेशची धावसंख्या, गोव्याविरुद्ध प्रतिस्पर्ध्यांनी नोंदविलेली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या, हैदराबादचा ४ बाद २२४ (२९ जानेवारी २०१७, चेन्नई) हा गोव्याविरुद्ध उच्चांक

- ४२२ : गोवा आणि मध्य प्रदेशच्या मिळून दोन्ही डावातील धावा. गोव्याचा समावेश असलेल्या सामन्यात सर्वाधिक

- मध्य प्रदेशची गोव्याविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या. यापूर्वी २७ फेब्रुवारी २०१९ रोजी इंदूर येथेच १९.४ षटकांत ६ बाद १९७ धावा

संबंधित बातम्या