
CK Naidu Cricket Tournament: यश क्षीरसागर, दिग्विजय पाटील व धीरज फटांगरे यांच्या अर्धशतकांच्या बळावर कर्नल सी. के. नायडू करंडक 25 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राने गोव्यावर आघाडी घेतली. सामना सोलापूर येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू आहे.
सोहम जमाले (6-65) याच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर सोमवारी सकाळी महाराष्ट्राने गोव्याचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळला. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राने 6 बाद 293 धावा केल्या होत्या, ते 18 धावांनी पुढे आहेत. सलामीच्या धीरज फटांगरे याने आक्रमक फलंदाजी करताना 54 चेंडूंत 54 धावा केल्या. त्याने सहा चौकार व तीन षटकार मारले. तिसऱ्या क्रमांकावरील यश क्षीरसागर याने 65 धावा करताना 99 चेंडूंत नऊ चौकार मारले. दिग्विजयने 110 चेंडूंत 81 धावा करताना 10 चौकार मारले.
फटांगरे व यश यांनी दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली, नंतर यश व दिग्विजय यांनी चौथ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.
संक्षिप्त धावफलक
गोवा पहिला डाव: (5 बाद 229 वरून): 106.3 षटकांत सर्वबाद 275 (योगेश कवठणकर 64, दीप कसवणकर 39, कीथ पिंटो 15, हेरंब परब 0, समीत आर्यन मिश्रा नाबाद 0, शुभम तारी 0, सोहन जमाले 6-65).
महाराष्ट्र पहिला डाव: 71 षटकांत 6 बाद 293 (धीरज फटांगरे 54, यश क्षीरसागर 65, दिग्विजय पाटील 81, अभिषेक पवार नाबाद 33, आनंद ठेंगे नाबाद 12, हेरंब परब 8-0-33-0, शुभम तारी 15-3-61-1, समीत आर्यन मिश्रा 12-3-35-1, कीथ पिंटो 19-1-85-3, दीप कसवणकर 7-0-46-0, योगेश कवठणकर 10-1-33-1).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.