जॉर्ज जॉनसाठी महेंद्रसिंग धोनी बसला इकॉनॉमी क्‍लासमध्ये

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

जॉर्ज यांचे पाय जास्त लांब असल्याने त्यांना इकॉनॉमी क्‍लासमध्ये बसण्यास त्रास होत असल्याचे धोनीच्या लक्षात आले. त्याने जॉर्ज यांना आपल्या जागेवर बसण्याची विनंती केली. 

दुबई: महेंद्रसिंग धोनीने क्रिकेट मैदानावरील प्रभावी कामगिरीने चाहत्यांना खूष केले आहे, मैदानाबाहेरही त्याच्या आदर्श वर्तणुकीचे अनेक चाहते आहेत. आयपीएलसाठी संघासोबत जात असताना त्याने उंचपुऱ्या सहप्रवाशाला इकॉनॉमी क्‍लासमध्ये बसण्यास त्रास होईल हा विचार करून आपली बिझनेस क्‍लासमधील आसन दिले. 

चेन्नई सुपर किंग्ज संघ नुकताच दुबईला रवाना झाला. संघाचे संचालक जॉर्ज जॉन यांचे तिकीट इकॉनॉमी क्‍लासचे होते, तर धोनीचे बिझनेस क्‍लासचे. जॉर्ज यांचे पाय जास्त लांब असल्याने त्यांना इकॉनॉमी क्‍लासमध्ये बसण्यास त्रास होत असल्याचे धोनीच्या लक्षात आले. त्याने जॉर्ज यांना आपल्या जागेवर बसण्याची विनंती केली. 

जॉर्ज यांनी याबाबतचा व्हिडीओ ट्विट केला. ज्याने खूप क्रिकेट पाहिले. त्यात सर्व काही साध्य केले आहे, त्याने मला त्याची बिझनेस क्‍लासचे आसन देऊ केले. तुमचे पाय खूपच लांब आहेत, तुम्ही माझ्या जागेवर बसा, मी इकॉनॉमी क्‍लासने प्रवास करतो, असे कर्णधाराने मला सांगितल्यावर आश्‍चर्याचा धक्काच बसला, असे ते म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या