IPL 2022 बद्दल धोनीने केले मोठे वक्तव्य, खेळणार की नाही…

चेन्नई (Chennai) येथे झालेल्या कार्यक्रमात त्याला हा प्रश्न विचारला असता त्याने आता त्यासाठी वेळ असल्याचे सांगितले.
Mahendra Singh Dhoni
Mahendra Singh DhoniDainiki Gomantak

आयपीएल 2021 (IPL 2021) चा हंगाम संपल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, धोनी आयपीएल 2022 मध्ये खेळणार की नाही? या प्रश्नाचे उत्तर सध्या चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) कर्णधाराने दिले आहे. चेन्नई येथे झालेल्या कार्यक्रमात त्याला हा प्रश्न विचारला असता त्याने आता त्यासाठी वेळ असल्याचे सांगितले. आता आयपीएल 2022 एप्रिलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

चेन्नई येथे झालेल्या कार्यक्रमात धोनी म्हणाला, मी याचा विचार करेन. IPL 2022 ला अजून बराच वेळ आहे. सध्या आम्ही नोव्हेंबर महिन्यात खेळत असून ही स्पर्धा एप्रिलमध्ये होणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2021 चे विजेतेपद पटकावले आहे. पिवळ्या जर्सीसह या संघाचे आयपीएलचे हे चौथे विजेतेपद आहे. हे विजेतेपद पटकावल्यानंतर त्याच्या पुढील मोसमात धोनी सहभागी होणार का नाही याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु त्याबद्दल धोनी काहीही बोलला नाही. मात्र आपण आपला वारसा तूर्त तरी सोडणार नसल्याचे त्यांनी निश्चितपणे सांगितले होते. ज्याला क्रिकेटप्रेमींनी तो आयपीएल 2022 मध्ये खेळणार असल्याचा एक मोठा इशारा मानला आहे.

Mahendra Singh Dhoni
IND vs NZ: टीम इंडिया व्हाईट वॉश साठी सज्ज !

IPL 2022 मध्ये 10 संघ खेळणार

आयपीएलच्या पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये बरेच बदल होणार आहेत. प्रथमच 8 ऐवजी 10 संघ खेळताना दिसतील. आयपीएल 2022 पासून दोन नवीन संघ अहमदाबाद आणि लखनौ खेळताना दिसतील. आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यानंतर, धोनीने स्टार स्पोर्ट्सच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सांगितले होते, “सीएसकेसाठी काय चांगले होईल ते आम्ही ठरवू. आम्हाला मजबूत संघ बनवायचा आहे. फ्रँचायझीसाठी काय चांगले आहे, कशाचा विचार करु नये हे ही आम्ही ठरवत आहोत. आम्हाला आता पुढील 10 वर्षे कामगिरी करणारा संघ तयार करायचा आहे.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com