महेंद्रसिंग धोनी करणार कुक्कुटपालन !

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

महेंद्रसिंग धोनीने कुक्कुटपालन करण्याचे ठरवले. त्याने रांचीतील पोल्ट्री फार्मसाठी दोन हजार कडकनाथ जातीची पिल्लांची मागणी नोंदवली आहे. 

भोपाळ : महेंद्रसिंग धोनीने कुक्कुटपालन करण्याचे ठरवले. त्याने रांचीतील पोल्ट्री फार्मसाठी दोन हजार कडकनाथ जातीची पिल्लांची मागणी नोंदवली आहे. 

कडकनाथ या कोंबड्या मूळच्या मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील आहेत. तेथील शेतकरी विनोद मेंडा हे धोनीची मागणी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार आहेत. सुरुवातीस धोनीने कडकनाथ मुर्गा संशोधन केंद्राचे संचालक आयएस तोमर यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी मेंडा यांना धोनीची मागणी पूर्ण करण्यास सांगितले आहे.

संबंधित बातम्या