आयपीएलच्या तयारीसाठी महेंद्रसिंग धोनी चेन्नईत दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

देशात कोरोनाचे आक्रमण सुरू होण्यापूर्वी आयपीएलच्या तयारीसाठी धोनी मार्च महिन्यात सराव करू लागला होता; परंतु कोरोनामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली आणि धोनीही लॉकडाऊन झाला.

रांची: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आणि सर्वांचे लक्ष लागून राहिलेला भारताचा यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी कोविड- १९ चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर चेन्नईत दाखल झाला. रांचीतील विमानतळ आणि चेन्नईत दाखल झाल्यावर धोनीच्या सोशल मीडियावरील छायाचित्रातून धोनीने प्रदीर्घ कालावधीनंतर त्याच्या चाहत्यांना दर्शन मिळाले.

 

इंग्लंडमधील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य सामन्यात झालेल्या पराभवानंतर धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिलेला आहे. देशात कोरोनाचे आक्रमण सुरू होण्यापूर्वी आयपीएलच्या तयारीसाठी धोनी मार्च महिन्यात सराव करू लागला होता; परंतु कोरोनामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली आणि धोनीही लॉकडाऊन झाला.

 

धोनी सोशल मीडियापासून दूरच असल्यामुळे ७ जुलै या त्याच्या वाढदिवशीही त्याचे चाहते धोनीला सर्च करत होते. आलिशान बंगल्यात मुलगी झिवा आणि श्‍वानांबरोबचे एकाद दुसरे छायाचित्र किंवा व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता. त्यात त्याची वाढलेली आणि पांढरी झालेली दाढी लक्ष वेधून घेत होती; मात्र अमिरातीत आयपीएल निश्‍चित झाल्यानंतर धोनी चेन्नईत जाण्यासाठी रांचीतील निवासस्थानातून प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच बाहेर पडला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या