Mallakhamba: भारताच्या पांरपारिक खेळाचा 'जग्गजेत्ता' अमेरिकेत ठरणार

दैनिक गोमंतक
गुरुवार, 20 मे 2021

कोरोनाची परिस्थिती टप्प्या टप्प्याने निवळत असून, अमेरिका मल्लखांब महासंघाने तयारीला सुरवात देखील केली आहे.

दोन वर्षापूर्वी मुंबईत (Mumbai) झालेल्या मल्लखांबाच्या (Mallakhamba) पहिल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेनंतर आता दुसऱ्या विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीला सुरवात झाली असून, ही स्पर्धा अमेरिकेत (USA) पार पडणार आहे. गेल्या वर्षीच ही स्पर्धा खेळविणे अपेक्षित होते. मात्र, अचानक आलेल्या कोरोनाच्या (COVID-19) वैश्विक महामारीने ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही स्पर्धा सप्टेंबर 2022 मध्ये अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क येथे घेण्यात येईल असे अमेरिकन मल्लखांब महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.(Mallakhamba: The world champion of India's traditional sport will be in the United States)

भारतात टी -20 वर्ल्डकप खेळणं अवघड; 'घरवापसी' नंतर ऑस्ट्रेलियन...

कोरोनाची परिस्थिती टप्प्या टप्प्याने निवळत असून, अमेरिका मल्लखांब महासंघाने तयारीला सुरवात देखील केली आहे. संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून, समिती सचिव चिन्मय पाटणकर, अमेरिकन मल्लखांब महासंघाच्या अध्यक्षा प्रज्ञा पाटणकर यांनी या प्रतिकूल काळातही या स्पर्धेच्या तयारीला सुरवात केली आहे.

मल्लखांबाच्या पहिल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेल्या 15 देशातील तसेच काही कारणाने या स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेल्या अनेक देशातील प्रतिनिधींची अलिकडेच अमेरिका मल्लखांब महासंघाच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला मेक्सिको, कॅनडा, फ्रांस, यू. के., नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, जपान, सिंगापूर, अमेरिका, भारत, ब्राझील तसेच पोलंड या देशांचे प्रतिनिधी हजर होते. विश्व मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष कृष्णकुमार तसेच महासचिव उदय वि. देशपांडे यांनाही या बैठकीस निमंत्रित करण्यात आले होते. संयोजन सचिव चिन्मय पाटणकर हे मल्लखांबाचा ध्यास घेतलेले मूळचे पुण्यातील राष्ट्रीय खेळाडू असून त्यांना छत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गेली 20 वर्षे ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.  या काळात त्यांनी अमेरिकेत मल्लखांबाची पाळेमुळे रुजविण्याचा उपक्रम चालवला आहे.

 

संबंधित बातम्या