मंदार लाड ऑनलाईन बुद्धिबळात विजेता

dainik gomantak
शनिवार, 23 मे 2020

स्पर्धेत राज्यभरातील ६६ बुद्धिबळपटूंनी भाग घेतला. यशस्वी स्पर्धकांचे संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल व सचिव किशोर बांदेकर यांनी अभिनंदन केले आहे.

पणजी,

गोवा बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या राज्य पातळीवरील पहिल्या ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत बार्देश तालुक्याच्या मंदार लाड याने विजेतेपद मिळविले. त्याने ९ फेऱ्यांतून ८ गुणांची कमाई केली.

तिसवाडी तालुक्याचा फिडे मास्टर नीतिश बेलुरकर याला उपविजेतेपद, तर बार्देशच्या पार्थ साळवी याला तिसरा क्रमांक मिळाला. व्हिवान बाळ्ळीकर याला चौथा क्रमांक मिळाला. याशिवाय शेन ब्रागांझा, साईरुद्र नागवेकर, आर्यन रायकर, कपिल पावसे, शेखर सिरसाट, तेजस शेट वेरेकर, आलेक्स सिक्वेरा, अन्वेश बांदेकर, अनिरुद्ध पार्सेकर, जॉय काकोडकर, हर्ष डागरे, वसंत नाईक, साईराज वेर्णेकर, लव्ह काकोडकर, उत्कर्ष गणपुले, नदिश सावंत यांना अनुक्रमे पाचवा ते विसावा क्रमांक मिळाला.

महिला गटात तिसवाडीची तन्वी हडकोणकर अव्वल ठरली. तिसवाडीच्याच प्रज्ञा काकोडकर हिला दुसरा, तर मुरगावच्या वालंका फर्नांडिस हिला तिसरा क्रमांक मिळाला.

स्पर्धेत राज्यभरातील ६६ बुद्धिबळपटूंनी भाग घेतला. यशस्वी स्पर्धकांचे संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल व सचिव किशोर बांदेकर यांनी अभिनंदन केले आहे.

 

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या २० वर्षांखालील ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेसाठी गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर लिऑन मेंडोसा व फिडे मास्टर नीतिश बेलुरकर यांनी सहभाग निश्चित केला आहे. त्यांच्याव्यतिरिक्त मंदार लाड, पार्थ साळवी, व्हिवान बाळ्ळीकर, शेन ब्रागांझा, तन्वी हडकोणकर, साईरुद्र नागवेकर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत खेळतील. आर्यन रायकर राखीव खेळाडू आहे.

संबंधित बातम्या