T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, प्रशिक्षक मार्क बाउचर यांचा राजीनामा

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे.
Mark Boucher
Mark BoucherDainik Gomantak

T20 World Cup 2022: पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे. मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी हा मोठा धक्का दिला आहे. आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक बाउचरने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इंग्लंड दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-1 अशी गमावली असतानाच ही बातमी आली आहे. आता आफ्रिका संघाला विश्वचषकासाठी सज्ज व्हावे लागणार आहे. आफ्रिकेने आतापर्यंत एकही विश्वचषक जिंकलेला नाही.

आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दिली माहिती

बाउचर यांच्या राजीनाम्याची बातमी खुद्द दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने (CSA) दिली आहे. ट्विटरवर बाउचरचा फोटो शेअर करत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'प्रोटीज मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणार आहे.'

Mark Boucher
वेदा कृष्णमूर्तिला केलं कर्नाटकच्या क्रिकेटपटूनं प्रपोज! पाहा फोटो

आफ्रिकन बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "स्वतःच्या भविष्यासाठी आणि वैयक्तिक हेतूंसाठी बाउचरने दुसऱ्या संधीच्या शोधात प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. बाउचर त्यांच्या कराराची मुदत वाढवू शकत नसल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दु:ख झाले आहे. क्रिकेट बोर्ड त्यांच्या निर्णयाचा आदर करत आहे. बाउचरला त्यांच्या भविष्यातील नवीन संधींसाठी शुभेच्छा."

बाउचरने 2019 मध्ये प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली

मार्क बाउचरने डिसेंबर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने आतापर्यंत 10 कसोटी सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्येही संघाने 23 टी-20 आणि 12 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. आफ्रिकेने भारतीय संघाचा कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. तसेच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आफ्रिका संघ सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत आफ्रिका संघाने बाऊचर यांच्या प्रशिक्षकपदाखाली चांगली कामगिरी केली आहे.

Mark Boucher
Chess Tournament: राज्यस्तरीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत नेत्रा सावईकर विजेती

दक्षिण आफ्रिका संघाला विश्वचषकापूर्वी भारतात यावे लागणार आहे. यादरम्यान बाउचर हे प्रशिक्षकपदी राहतील आणि प्रशिक्षक म्हणून ही त्यांची शेवटची मालिका असेल. या मालिकेत भारत आणि आफ्रिका यांच्यात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. तर प्रशिक्षक म्हणून बाउचरची शेवटची स्पर्धा ही विश्वचषक असणार आहे. यावेळी आफ्रिका संघाला टी-20 विश्वचषकात टीम इंडिया, बांगलादेश आणि पाकिस्तानसोबत एकाच गटात ठेवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com