मास्टर ब्लास्टरची कोरोना रुग्णांसाठी मोठी आर्थिक मदत

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

कोरोना संकटात अडकलेल्या कोरोना रुग्णांसाठी कोट्यावधीची मदत केली आहे.

भारतात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह परिस्थिती निर्माण होत चालली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यातच आता मास्टर ब्लास्टर संचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) कोरोना संकटात अडकलेल्या कोरोना रुग्णांसाठी कोट्यावधीची मदत केली आहे. ऑक्सिजनच्या खरेदीसाठी उभारण्यात येत असलेल्या मोहिमेतर्गंत त्याने 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. (Master Blasters great financial help for corona patients)

देशभर कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने पिडीतांना तातडीने मदत मिळावी म्हणून हा निधी जमा करण्यात आला असल्याचे राजस्थान संघाकडून सांगण्यात आलं आहे. भारतात कोरोना संसर्ग होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी देशात कोरोना संक्रमणाची 3,79,257 नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोनाशी लढा: राजस्थान संघाकडून भारताला मोठी मदत

भारतातील कोरोना संकटावर मात करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू पॅट कमिन्सने 37 लाखांची मदत केली आहे. पॅट कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीने मदतीचा हात पुढे केला होता. त्याने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जवळपास 42 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. कमिन्सने भारताच्या या कठिण काळात मदत करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना विनंती केली होती. या आवाहनानंतर ब्रेट लीने मदत केली होती.

संबंधित बातम्या