ऐकावं ते नवलच! टी-20 च्या इतिहासात पहिल्यादांच घडलं असं

Cricket
Cricket

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने विजय मिळवला आहे. आणि या विजयासह तीन टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडच्या संघाने पहिले दोन्ही सामने खिशात घालत मालिकेवर वर्चस्व राखले. दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा 28 धावांनी पराभव केला. सामन्याच्या मधेच आलेल्या पावसामुळे न्यूझीलंडच्या संघाने 17.5 षटकांत 5 गडी गमावून 173 धावा केल्या  होत्या. आणि पावसामुळे बांगलादेशच्या संघाला 16 षटकांत 170 धावा कराव्या लागणार होत्या. मात्र बांगलादेशचा संघ 16 षटकांत 7 गडी गमावून 142 धावाच करू शकला. मात्र या सामन्यात असे काही पाहायला मिळाले जे यापूर्वी कधीच घडले नव्हते. (In the match against New Zealand Bangladesh started playing without knowing the target)

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघातील सरकार (51) आणि मोहम्मद नईम (38) यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर 173 धावसंख्या उभारली होती. यानंतर न्यूझीलंड संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाने नेमके लक्ष्य कळण्यापूर्वीच खेळण्यास सुरवात केल्याचे पाहायला मिळाले. सामन्यादरम्यान मॅच रेफरी जेफ क्रो यांनी पावसामुळे सुधारित स्कोअरचा अधिकृतपणे निर्णय घेण्यापूर्वीच बांगलादेशने खेळण्यास सुरवात केली. त्यानंतर मैदानातील अंपायर्सने 1.3 ओव्हर्सवर लक्ष्य ठरवण्यासाठी खेळ थांबवला. 

बांगलादेशच्या (Bangladesh) सलामीवीर फलंदाजांनी 16 षटकात 148 धावा करायच्या असल्याचे समजून खेळण्यास सुरवात केली. परंतु 1.3 षटकांनंतर मैदानावरील अंपायर्सने अचानक फील्डरकडून चेंडू घेतला आणि सामना काही काळ थांबविला. बांगलादेशला मिळलेल्या लक्ष्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आणि त्यामुळेच काही काळ खेळ थांबवण्यात आला. परंतु त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशच्या संघाला 16 षटकांत 170 धावांचे लक्ष्य देण्यात आले. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे काही घडले ज्यावेळी प्रतिस्पर्धि संघ ठराविक लक्ष्यच माहित नसताना खेळू लागला. शिवाय यावेळी खेळ सुमारे 5 मिनिटे थांबला होता. 

सामन्याच्या वेळेस घडलेल्या या गोष्टीनंतर न्यूझीलंडचा (New Zealand) अष्टपैलू खेळाडू जेम्स नीशमने सोशल मीडियावर यासंदर्भात मजेदार ट्विट केले आहे. जेम्स नीशमने यावर बोलताना, हे कसे शक्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच त्याने लक्ष्याचा पाठलाग न कळताच खेळ सुरु केला असल्याचे म्हटले आहे. आणि याशिवाय जेम्स नीशमने पुढे क्रेजी स्टफ असे आपल्या ट्विट मध्ये पुढे लिहिले आहे.        

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com