ISL 2020-21 : ओडिशा-ईस्ट बंगाल लढत केवळ औपचारिकता

दैनिक गोमन्तक
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

ओडिशा एफसी आणि ईस्ट बंगाल यांच्यात सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (ता. 27) होणारा सामना केवळ औपचारिकता असेल.

पणजी : ओडिशा एफसी आणि ईस्ट बंगाल यांच्यात सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (ता. 27) होणारा सामना केवळ औपचारिकता असेल. ओडिशाने विजय नोंदविला, तरीही त्यांच्या शेवटच्या अकराव्या क्रमांकात फरक पडणार नाही.

विजय हजारे करंडक : गोव्याने साकारला पहिला विजय

ओडिशा व ईस्ट बंगाल यांच्यातील सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर होईल. दोन्ही संघांची ही स्पर्धेतील शेवटची लढत असल्यामुळे विजयी समारोप करण्यात ते इच्छुक असतील. ईस्ट बंगालने 19 लढतीतून 17 गुणांची कमाई केली असून ते सध्या नवव्या क्रमांकावर आहेत. ओडिशाला नमविल्यास त्यांना गुणतक्त्यात चेन्नईयीन एफसीला (20 गुण) गाठणे शक्य होईल. आयएसएलमधील पदार्पणात खराब सुरवातीनंतर कोलकात्यातील संघाने आतापर्यंत तीन सामने जिंकले आहेत.

INDVsENG : इंग्लंड दोनच दिवसात हरल्यामुळे केविन पीटरसन भडकला; म्हणाला..

ओडिशाची स्पर्धेतील कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. 19 लढतीत त्यांना फक्त एकच सामना जिंकता आला. तब्बल 12 पराभवाची नामुष्की त्यांच्यावर आली असून सर्वाधिक 39 गोल त्यांनी स्वीकारले आहेत. ओडिशाचे फक्त नऊ गुण असून ते तळात आहेत. त्यांचा मागील लढतीत मुंबई सिटीने 6 - 1 फरकाने धुव्वा उडविला होता. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ईस्ट बंगालने वास्को येथे ओडिशा एफसीला 3 - 1 फरकाने हरविले होते.

संबंधित बातम्या