MS Dhoni Video: धोनीच्या मैदानातील एन्ट्रीला गाणी लावणारा 'डीजेवाला बाबू' नक्की कोण?

एमएस धोनीच्या मैदानातील एन्ट्रीवेळी गाणी वाजवणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती आहे का?
MS Dhoni | DJ Zen
MS Dhoni | DJ ZenDainik Gomantak

DJ Zen the man plays music during CSK Captain MS Dhoni Entry: इंडियन प्रीमियर लीग २०२३ मधील आता केवळ दोन सामने बाकी आहेत. या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने यापूर्वीच अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी बराच चर्चेत राहिलेला दिसला. त्याचे अनेक रिल्सही व्हायरल झाले आहेत.

त्यातही धोनीच्या प्रत्येक एन्ट्रीवेळी लागणाऱ्या गाण्यांमुळे त्याचे व्हिडिओ तर खूपदा व्हायरलही झाले. एमए चिदंबरम स्टेडियमवरील त्याच्या एन्ट्रीच्या वेळी लागलेल्या गाण्यांनी चाहत्यांमध्येच्या उत्साहात आणखी उर्जा भरली होती. अनेकांना धोनीच्या एन्ट्रीवेळी 'वन्स अपॉन अ टाईम, देअर लिव्ह अ घोस्ट' हे गाणं लागलेला व्हिडिओ पाहिला असेल.

पण धोनीच्या एन्ट्रीवेळी स्टेडियममध्ये ही गाणी लावणारा हा व्यक्ती कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. नुकताच आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

MS Dhoni | DJ Zen
MS Dhoni Argues with Umpires: पाथिरानासाठी धोनीने थांबवला खेळ? पंचांशीही भिडला..., वाचा नक्की काय झाली भानगड

या व्हिडिओमध्ये केसी सेंथिल कुमार उर्फ डीजे झेन याची ओळख करून दिली आहे. डीजे झेन हा एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवरील म्युझिक सिस्टिम सांभाळतो. त्याने या आयपीएल हंगामावेळी धोनीच्या तसेच अनेक क्रिकेटपटूंसाठी वाजवलेली गाणी चर्चेचा विषय ठरली. विशेषत: धोनीच्या एन्ट्रीसाठी. त्याने धोनीच्या एन्ट्रीचे शेअर केलेले व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले.

याबद्दल त्याने आयपीएलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माहितीही दिली आहे. त्याने सांगितले की 'मी डीजे झेन मी चेपॉक स्टेडिमवमधील म्युझीक सांभाळतो. इथे असणे अभिमानाचे आहे आणि प्रेक्षकांसाठी गाणी वाजवणे. मी साधारण असे म्युझिक ट्रॅक शोधतो, ज्याचे शब्द त्या खेळाडूला मिळतेजुळते असते.'

'जेव्हा धोनीसारखा खेळाडू असतो, तेव्हा आम्ही अशी गाणी वाजवतो, जी प्रेक्षकांना आपली वाटू शकतात. त्या एका मॅच नंतर मी पडयप्पा गाण्यावरील धोनीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला. तो खूप व्हायरल झाला, जे अनपेक्षित होते. त्याला २३ मिलियन व्ह्युज आले.'

'तमिळनाडूमध्ये रजनीसारख्या लोकांना सेलिब्रेट केले जाते, ते लोकांना आपले वाटतात. धोनीही जरी इथे जन्मलेला नसला, तरी तो येथील लोकांना आपला वाटतो. थाला धोनीला मी एकच मेसेज देतो की खेळत राहा.'

MS Dhoni | DJ Zen
IPL 2023: गेल्यावर्षी 9 वा क्रमांक, पण यंदा थेट फायनलमध्ये! CSK च्या 'परफेक्ट कमबॅक'ची 5 कारणे

डीजे झेन अनेकदा धोनीच्या एन्ट्रीवेळी पडयप्पा, बाषा, विक्रम अशा चित्रपटांमधील गाणी लावताना दिसला आहे. तसेच तो फक्त धोनीच नाही, तर वेगवेगळ्या खेळाडूंसाठी त्याच्या व्यक्तीमत्त्वानुसार किंवा खेळानुसार गाणी वाजवतो.

दरम्यान, जसे चेपॉक स्टेडियमवर डीजे झेन म्युझिक सिस्टिम सांभाळतो, तसे जवळपास प्रत्येक स्टेडियममध्ये म्युझिक सिस्टिम सांभाळण्यासाठी लोक असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com