मेस्सी आणि नेमार घेणार चीन निर्मित कोरोना लस

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 1 मे 2021

लिओनेल मेस्सी आणि नेमार चीनची सिनेव्हॅक बायोटेकद्वारा निर्मित कोरोना लस घेणार आहेत.

फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि नेमार (Neymar) चीनची सिनोव्हॅक बायोटेकद्वारा (China Sinovac Vaccine) निर्मित कोरोना लस घेणार आहेत. या खेळाडूंसोबत दक्षिण अमेरिकेतील (South America) अनेक दिग्गज फुटबॉलपटूंना ही लस देण्यात येणार आहेत. प्रादेशिक फुटबॉल फेडरेशन-कोन्मेबोल यांनी या बातमीची पुष्टी केली आहे. (Messi and Neymar will take the China made corona vaccine)

कोन्मेबोलने सांगितले की, त्यांनी आपल्या 10 सदस्य संघटनांना चीनी लस देण्यास सुरु केलं आहे. गुरुवारी चीनी लसीची पहिली तुकडी उरुग्वेची राजधानी मॉन्टेविडीया येथे दाखल झाली आहे. यात 50 हजार डोस आहेत. दक्षिण अमेरिकेच्या खेळाडूंना चीनी लस दिल्यानंतर या भागामधील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा कोपा अमेरिकेच्या आयोजनाची शक्यता वाढली आहे.

AFC Champions League: धडाकेबाज विजयासह पर्सेपोलिसची आगेकूच

कोपा अमेरिकेचा 47 वा हंगाम 2020 मध्ये होणार होता, मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तो पुढे ढकलण्यात आला. कोपा स्पर्धेमध्ये नेमार आणि मेस्सी आपआपल्या देशांचे प्रतिनिधित्व करतात आणि हेच कार्यक्रमाचे खास आकर्षण आहे.
 

संबंधित बातम्या