पेलेचा विक्रम मोडित काढत मेस्सीने घातली आणखी एका विक्रमाला गवसणी

lionel messi
lionel messi

माद्रिद- लिओनेल मेस्सीने पेले यांच्या एकाच क्‍लबकडून सर्वाधिक ६४३ गोल करण्याचा विक्रम मोडीत काढला, पण मेस्सीचा हा गोल २० वेळा चेंडू पास होऊन झाल्यामुळे जास्तच संस्मरणीय झाला. ला लीगा मोसमातील हा सर्वाधिक पासचा गोल आहे.

बार्सिलोनाने ला लिगा अर्थात स्पॅनिश साखळीत व्हॅलादॉलिद संघाला ३-० असे हरवले. या सामन्यातील बार्सिलोनाचा तिसरा गोल मेस्सीने केला. मेस्सीने बार्सिलोनाकडून खेळताना आता ६४४ गोल केले आहेत. पेले यांनी सॅंतोस संघाकडून खेळताना ६४३ गोल करण्याचा पराक्रम केला होता. बार्सिलोनाच्या या सामन्यातील पहिल्या दोन गोलातही मेस्सीचा मोलाचा वाटा होता. पहिल्या गोलच्या वेळी त्याचा अचूक क्रॉस मोलाचा ठरला होता; तर दुसऱ्या गोलच्या वेळी त्याने प्रभावी चाल रचली होती. या कामगिरीमुळे मोसमात बार्सिलोनाने पाच अवे लढतीत प्रथमच विजय 
मिळवला.

फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली त्या वेळी विक्रम मोडण्याचा विचारही मनात नव्हता. पेले यांच्या विक्रमापर्यंत वाटचाल करता येईल असे कधीही वाटले नव्हते. या सर्व गोलांसाठी साथ देणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे, असे मेस्सीने सांगितले. मेस्सीने बार्सिलोनाकडून ७४९ वी लढत खेळत असताना विक्रमी गोलांचा टप्पा गाठला. त्याने आता प्रत्येकी १.१६ सामन्यांमागे एक गोल केला आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com