Michael Clarke वर दुसऱ्यांदा गंभीर आरोप, पहिल्यांदा Private Photos लीक; आता गर्लफ्रेंडने...!

Michael Clarke And Jade Yarbrough: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क सध्या चांगलाच अडचणीत अडकला आहे.
Michael Clarke And Jade Yarbrough
Michael Clarke And Jade YarbroughDainik Gomantak

Michael Clarke And Jade Yarbrough: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क सध्या चांगलाच अडचणीत अडकला आहे. अलीकडेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रो क्लार्कला उघडपणे थप्पड मारताना दिसत आहे. पण ही काही पहिलीच वेळ नाही, याआधी मायकल क्लार्क अशा वादात सापडला आहे.

दरम्यान, मायकेल क्लार्कची (Michael Clarke) गर्लफ्रेंड जेड यारब्रोने अलीकडेच त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. जेड यारब्रो एक इंटिरियर डिझायनर आहे. विशेष म्हणजे, हे दोघे गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत.

Michael Clarke And Jade Yarbrough
IND vs NZ: गोलंदाजांच्या शानदार कामगिरीला, फलंदाजांची साथ! दुसऱ्या वनडेत Team India चा दणदणीत विजय

यापूर्वी, मायकेल क्लार्कने 2012 मध्ये काइलीशी लग्न केले होते. पण 2019 मध्ये त्याने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. वास्तविक, क्लार्कचे त्याच्याच असिस्टंटसोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते, ज्यामुळे त्याला काइलीला घटस्फोट (Divorce) द्यावा लागला होता. दोघांनाही एक मुलगी आहे, तिचे नाव केल्सी आहे.

2018 मध्ये, ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये अशी बातमी आली होती की, मायकेल क्लार्कचे त्याची असिस्टंट साशासोबत अफेअर होते. साशा मायकल क्लार्कच्या क्रिकेट अकादमीचे काम सांभाळत असली तरी व्यस्त वेळेनंतर दोघेही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत असत.

Michael Clarke And Jade Yarbrough
IND vs AUS: कोण जिंकणार बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, विजेत्याचा अंदाज...

तसेच, मायकेल क्लार्क आणि साशाचे काही फोटो लीक झाले होते, ज्यामध्ये ते एका आलिशान यॉटमध्ये पहुडलेले दिसत होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर क्लार्कच्या घरगुती आयुष्यात वादळ आले. क्लार्कने त्यावेळी त्याच्या असिस्टंटसोबतच्या संबंधाबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही.

Michael Clarke And Jade Yarbrough
AUS vs SA Test: भर सामन्यात स्टार्कची दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला धमकी, क्रिज सोडली तर...

दुसरीकडे, मायकेल क्लार्कची गणना जगातील विस्फोटक फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने एकट्याने ऑस्ट्रेलियाला (Australia) 2015 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला. क्लार्कने 115 कसोटी सामन्यात 8643 धावा, 245 एकदिवसीय सामन्यात 7981 धावा आणि 34 टी-20 सामन्यात 488 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com