INDvsENG 'जो रूट'ला टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऑटोग्राफ केलेली जर्सी का नाही दिली?

INDvsENG 'जो रूट'ला टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऑटोग्राफ केलेली जर्सी का नाही दिली?
Michael Vaughan asked if Team India has gifted signed jersey to Joe Root on his 100th test match

नवी दिल्ली : चेन्नईच्या चेपॉक मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान खेळवला गलेला पहिला कसोटी सामना पाहुण्या इंग्लंड संघाने 227 धावांनी जिंकला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट दुहेरी शतक झळकावत सामनावीर ठरला. हा सामना रूटसाठी विशेष होता, कारण तो त्याच्या कसोटी कारकिर्दीचा 100 वा सामना होता. 100 व्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा रूट जगातील पहिला खेळाडू ठरला. सामना संपल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी विचारले आहे की टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी जो रूटला का नाही दिली ?

INDvsENG : दारुण पराभवानंतर पीटरसनने टीम इंडियाला डिवचलं; केलं हिंदीत ट्विट!

ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर भारताच्या अविस्मरणीय विजयानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू नॅथन लायनला टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऑटोग्राफ केलेली जर्सी दिली. नॅथन लियोन गाबा येथे आपला 100 वा कसोटी सामना खेळत होता. वॉनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, "गाबा येथे कसोटी जिंकल्यानंतर भारताने नाथन लायनला त्याच्या 100 व्या सामन्यासाठी साइन जर्सी दिली होती. भारताने सामना गमावल्यानंतर जो रुटलाही ही जर्सी मिळाली आहे का?

जो रुटने इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार होत इंग्लंडच्या मायकेल वॉनची बरोबरी केली आहे. रूटच्या नेतृत्वात इंग्लंडने पहिल्या कसोटीत भारताला पराभूत केले आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडचा संघ पॉइंट टेबलमध्ये वरच्या स्थानी पोहोचला आहे, तर भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com