मायकेल वॉनने भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेवर केली भविष्यवाणी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेविषयी मायकल वॉनने मोठी भविष्यवाणी केली आहे.

भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेविषयी मायकल वॉनने मोठी भविष्यवाणी केली आहे. मायकल वॉनच्या भविष्यवाणीवर माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे.

मायकल वॉनचा असा विश्वास आहे की, ''भारतीय संघ इंग्लंडविरुध्दच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 ने विजय संपादन करेल. वॉनच्या मतानुसार, इंग्लंड संघाचा कसोटी कप्तान जो रुट आणि वेगवान गोलंदाज जोप्रा आर्चर यांच्या अनुपस्थितीचा टीम इंडियाला मोठा फायदा होईल. आणि ते मालिका जिंकू शकतात.'' मायकेल वॉनने ट्विटद्वारे ही भविष्यवाणी केली. (Michael Vaughan predicts India England ODI series)

INDvsENG : व्यंकटेश प्रसाद यांनी सांगितले एकदिवसीय मालिकेत कोण ठरणार वरचढ

त्यावर समालोचक आकाश चोप्राने मायकेल वॉनच्या या भविष्यवाणीला प्रतिसाद दिला आहे. आकाश म्हणाला, ''भारतीय संघातही मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, आणि रविंद्र जडेजा यांच्यासारखे खेळाडू नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी ही मालिका अजिबात सोपी असणार नाही. इंडिया-इंग्लंड या दोन्ही संघामधील अनेक खेळाडू या मालिकेबाहेर आहेत. इंग्लंडचा संघ रोटेशन पध्दतीनुसार कार्यरत आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला संधी दिली जात आहे.''

तर दुसरीकडे, भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गैरहजर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा जखमी झाले होते. ते अद्याप दुखापतीतून सावरलेले नाही, हे दोन्ही खेळाडू आयपीएलदरम्यान पुनरागमन करु शकतात.

 

संबंधित बातम्या