INDvsENG: मायकेल वॉनने पाकच्या मैदानाचा फोटो केला शेअर; खेळपट्टीवरून पुन्हा डिवचले  

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दोन सामने चेन्नईत पार पडले. तर उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या नव्या सरदार वल्लभभाई पटेल (मोटेरा) आंतरराष्ट्रीय स्टेडियम वर खेळवण्यात येणार आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दोन सामने चेन्नईत पार पडले. तर उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या नव्या सरदार वल्लभभाई पटेल (मोटेरा) आंतरराष्ट्रीय स्टेडियम वर खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंडच्या संघावर 317 धावांनी विजय मिळवत पहिल्या सामन्याच्या पराभवाची परतफेड केली होती. परंतु या सामन्याच्या वेळेस चेपॉक स्टेडियमवरील खेळपट्टीवरून बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 

मास्टर ब्लास्टरने पहिल्यांदाच भारतीय संघात निवडलेल्या खेळाडूंचे केले अभिनंदन  

इंग्लंड संघाचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी खेळपट्टीबाबत बोलताना, पाच दिवसांच्या कसोटी सामन्यासाठी खेळपट्टी फिट नसल्याचे वक्तव्य केले होते. व त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नशी मायकेल वॉनचे ट्विटरयुद्ध पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता मायकेल वॉनने ट्विटरवर पाकिस्तानमधील मैदानाचा फोटो शेअर करत, दुसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीवर निशाणा साधला आहे. मायकेल वॉनने मैदानाचा फोटो शेअर करताना, हे खूप छान असल्याचे म्हटले आहे. तसेच या मैदानावरील खेळपट्टी देखील चांगल्या प्रकारे तयार केली असल्यासारखे वाटत असल्याचे मायकेल वॉनने आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे. 

याअगोदर, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळेस मायकेल वॉन खेळपट्टीवरून बरेच प्रश्न उपस्थित केले होते. आणि ही खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी पात्र नसल्याचे पुढे म्हटले होते. त्यानंतर वॉनच्या तक्रारीवर भाष्य करताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी काही जण नेहमीच तक्रारी करतात आणि त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असा टोला लगावला होता. याशिवाय शेन वॉर्नने देखील मायकेल वॉनला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

दरम्यान, इंग्लंडसोबतच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत सामना आपल्या खिशात घातला होता. रविचंद्रन अश्विनने सामन्यात गोलंदाजी करताना आठ विकेट्ससह दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शानदार शतकी खेळी केली होती. तेच आपला पहिला सामना खेळत असलेल्या अक्षर पटेलने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या होत्या. टीम इंडियाने इंग्लंडच्या संघाला 482 धावांचे लक्ष्य दिले होते. व त्याबदल्यात पाहुण्या संघाचा डाव 164 धावांवरच आटोपला होता. 

संबंधित बातम्या