धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण

दैनिक गोमंतक
गुरुवार, 20 मे 2021

भारताचे  फ्लाइग सिख म्हणजेच धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh)  यांना कोविड 19 (Covid 19)  ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली: भारताचे  फ्लाइग सिख म्हणजेच धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh)  यांना कोविड 19 (Covid 19)  ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.  कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना  त्यांच्या चंडीगढ येथील निवासस्थानी गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.  ९१ वर्षीय मिल्खा सिंग यांना कोविडची लक्षणे  नव्हती. मात्र, आमच्या  काही कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्यामुळे आम्ही  कुटुंबातील सर्वांनी चाचणी करून घेतली.  त्यात फक्त  माझीच टेस्ट पॉझिटिव्ह  आल्याने मी हैराण झालो असल्याचे  मिल्खा सिंग यांनी म्हटले आहे.  त्याचबरोबर त्यांनी आपल्या प्रकृतीचीही माहिती दिली आहे.  (Milkha Singh contracted corona) 

भारतात टी -20 वर्ल्ड खेळणं अवघड; 'घरवापसी' नंतर ऑस्ट्रेलियन दिग्गजाची...

''माझी प्रकृती पूर्णपणे ठिक असून मला ताप किंवा खोकला नाही. तसेच येत्या तीन चार दिवसातच मी ठीक होईल, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.  यापूर्वी कोविडची लस घेण्याची मला गरज वाटत नव्हती. पण आता लस घेणे जरुरीचे असल्याची  जाणीव झाली आहे.  देशभरातील चाहत्यांचे प्रेम आणि प्रार्थनेमुळे मी लवकर बरा होईन,  असेही मिल्खा सिंग यांनी म्हटले आहे. तसेच सर्वांनी लवकरात लवकर लस घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.  दरम्यान, मिल्खा सिंग यांचा मुलगा गोल्फपटू जीव मिल्खा सिंह सध्या दुबईत असून शनिवारी परत येणार आहे. 'मी शहराबाहेर आहे आणि परवा भारतात परत येईल.  पण वडिलांच्या आरोग्याबाबत सांगायचे झाल्यास, सध्या ते थिक आहेत, त्यांच्यासमवेत एक नर्स आहे आणि ती तीचे काम योग्यरित्या करत आहे. ' असे जीव सिंगने सांगितले आहे.  

दरम्यान, . चंदीगडमधील कोविडची साखळी आता हळू हळू कमी होत असून गेल्या दहा दिवसांत कोविड  संसर्गाचे प्रमाण निम्म्याहूनही कमी झाले आहे. 9 मे रोजी शहरात 895 संक्रमित रुग्ण आढळले आणि 10 रुग्णांचा मृत्यू झाला. तर चंदीगडमध्ये बुधवारी (ता.19)  414 नवीन कोविड रुग्णांची नोंद करण्यात आली बुधवारी  9 कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्याचबरोबर विलगी करणात  ठेवलेल्या 870 रुग्णांना 10 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर रुग्णालयातून सोडण्यात आले. आरोग्य विभागाने गेल्या 24 तासांत कोरोनामधील 2945 लोकांची तपासणी केली. यापैकी 414  संसर्गित रुग्ण आढळले असून 104 लोकांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत.  

संबंधित बातम्या