IPL 2021: कर्णधार विराट कोहलीच्या 'एका चुकीमुळे' सामन्याचा निकाल बदलू शकला असता

दैनिक गोमंतक
शनिवार, 10 एप्रिल 2021

टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव खूप महत्वाची असते कारण त्यावर तुमच्या संघाचा विजय किंवा पराजय देखील ठरू शकतो. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्रातील पहिला सामनाही असाच थरारक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव खूप महत्वाची असते कारण त्यावर तुमच्या संघाचा विजय किंवा पराजय देखील ठरू शकतो. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्रातील पहिला सामनाही असाच थरारक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. आरसीबीने जरी हा सामना आपल्या नावावर केला असला तरी, कर्णधार विराट कोहलीने केलेल्या एका चुकीमुळे हा विजय पराजयात बदलू शकत होता. (This mistake of captain Virat Kohli could have turned the victory of Mumbai Indians into defeat)

IPL 2021 MIvsRCB : नेहमीप्रमाणे मुंबईची लोकल पहिल्या सामन्यात घसरली; बेंगलोरचा...

शुक्रवारी पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या डावाच्या 19 व्या षटकाचे चेंडू फेकणाऱ्या काईल जेम्सिनच्या तिसऱ्या बॉलला नो बॉल म्हटले गेले, कारण यावेळी थर्टी यार्ड सर्कलमध्ये फक्त तीन खेळाडू उपस्थित होते त्यामुळे पंचाने नो बॉल दिला. नियमांनुसार टी-ट्वेन्टी सामन्यात कोणत्याही वेळी चार क्षेत्ररक्षक थर्टी यार्ड सर्कलमध्ये असणे बंधनकारक असते. कोहलीच्या या चुकीमुळे मुंबईला धाव, अतिरिक्त चेंडू आणि फ्री हिट सुद्धा  मिळाला. शेवटच्या बॉलपर्यंत चाललेल्या या सामन्यात कोहलीची ही चूक आरसीबीला भारी पडू शकली असते.  

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ख्रिस लिनच्या डावात 49 धावांच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 षटकांत 9 विकेट गमावून 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबी (RCB) संघाने शेवटच्या षटकात ग्लेन मॅक्सवेल (39) आणि एबी डिव्हिलियर्सने २७ चेंडूंत  48 धावा घेत त्याने तुफानी डाव खेळला, आणि त्यामुळेच  160  धावांचे लक्ष्य गाठण्यास रॉयल चॅलेंजर बंगळुरू (Royal Challengers Bangalore) चा संघ यशस्वी झाला. 

संबंधित बातम्या