मोईन अलीने शॉट मारून टाटाची ऑफर केली ब्रेक

मैदानावर मोईनने आपल्या संघासाठी चौकार मारले, आणि त्या बदल्यात मिळालेल्या पैशाचा फायदा गेंड्यांना मिळाला आहे.
Moeen Ali
Moeen AliDainik Gomantak

जेव्हा खेळाडू चांगला खेळतो तेव्हा त्याला त्या बदल्यात पैसे पुरस्कार म्हणून मिळतात. आयपीएलमध्ये, सर्वोत्तम कॅच, सर्वाधिक चपळपणा, सर्वाधिक सिक्सर आणि चौकार मारणाऱ्या खेळाडूंना पैसे देण्यासाठी अनेक कारणे आहेत. पण, चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज मोईन अलीने गेंड्याच्या मदतीसाठी पैसे जमवले आहेत. (Moeen Ali has broken Tata offer by hitting a four)

Moeen Ali
एफसी गोवाचा पंचतारांकित विजय

मैदानावर मोईनने आपल्या संघासाठी चौकार मारले, आणि त्या बदल्यात मिळालेल्या पैशाचा फायदा गेंड्यांना मिळाला आहे. मोईन अलीने या सामन्यात ट्रेंट बोल्टविरुद्ध 6 चौकार मारले. पण त्या चौकारांमधून, त्याला गेंड्यांना मदत करण्याइतकी रक्कम मिळाली नाही, जी त्याने युझवेंद्र चहलच्या चेंडूवर चौकार मारून मिळवली आणि आपली रक्कम जमा केली.

मोईन अलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध अप्रतिम खेळी खेळली आहे. जरी त्याची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नसली तरी मोईन अलीने 57 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांसह 93 धावा केल्या आहेत. एकंदरीत, मोईन अलीने आपल्या डावात 16 चौकार ठोकले आणि या 16 चौकारांपैकी एक चौकार असा होता ज्याने गेंड्यांना मदत करण्यासाठी 5 लाख रुपये उभे केले.

Moeen Ali
पावसामुळे गोव्यातील क्रिकेट विस्कळीत

चहलच्या चेंडूवर मोईन अलीने चौकार मारला

चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) डावातील 7व्या ओव्हरमध्ये मोईन अलीने (Moeen Ali) युझवेंद्र चहलच्या चेंडूवर पैसे मिळवून देणारा चौकार मारला. त्याने कव्हर एरियामध्ये हवाई शॉट खेळला आणि चेंडू सीमारेषा ओलांडून टाटा पंचच्या बोर्डाला जाऊन लागला. फक्त त्या बोर्डवर चेंडू मारून 5 लाख रुपये मिळाले. असे का, आता फक्त त्याचे कारण जाणून घ्या. खरं तर, आयपीएल 2022 चे टायटल स्पॉन्सर टाटा ग्रुप आहेत तर सीझन सुरू होण्यापूर्वी टाटाने सांगितले होते की, टाटा पंच बोर्डवर कोणत्याही फलंदाजाने शॉर्ट मारल्यास गेंड्यांना मदत करण्यासाठी आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये (Kaziranga National Park) 5 लाख रुपये दान केले जातील.

राजस्थानने चेन्नईवर 5 विकेट्सने केली मात

राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम खेळताना चेन्नई सुपर किंग्जने 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 150 धावा ठोकल्या. यामध्ये 93 धावा एकट्या मोईन अलीच्याच होत्या. प्रत्युत्तरात 151 धावांच्या टागरेटचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने 2 चेंडू बाकी असताना 5 गडी गमावून 151 धावांचे टारगेट गाठले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com