"IPL 2021 चे जेतेपद हेच आमचे लक्ष्य"

delhi capital 2.jpg
delhi capital 2.jpg

आयपीएल 2020 ची उपविजेती टीम दिल्ली कॅपिटलचे सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी असा दावा केला आहे की त्याच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे आपल्या संघाला विजयी करू शकतात. आयपीएल 2021 चे विजेतेपद जिंकण्यापेक्षा दिल्ली संघाला दुसरी कुठलीच अपेक्षा नाही, असे मत शनिवारी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल टीमच्या सराव सत्रात हजर असलेले मोहम्मद कैफ यांनी व्यक्त केले आहे. (Our goal is to win the IPL 2021," said Mohammad Kaif)

सहाय्यक प्रशिक्षक कैफ म्हणाले की, "आम्हाला यावर्षी आणखी एक पाऊल पुढे जायचे आहे आणि हेच दिल्ली कॅपिटल संघाचे लक्ष्य आहे. जेतेपद जिंकण्यासाठी आमच्याकडे खेळाडू आहेत. आम्ही मागील वर्षी विजयाच्या खूप जवळ होतो आणि या मोसमातील प्लस पॉइंट हाच आहे की ऋषभ पंतसारखे बरेच खेळाडू उत्तम खेळत आहेत. ते नियमित खेळत असल्याने त्यांचा सराव होतो आहे, म्हणून ते आयपीएल मध्ये सुद्धा फॉर्म मध्ये असतील." तसेच शनिवारी दिल्लीच्या  खेळाडूंनी सराव सत्रात प्रकाशझोतात झेल पकडण्याचा सराव केला. 

खेळाडू गेल्या काही दिवसांपासून फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करत होते. कोचिंग ग्रुप म्हणून आम्ही आजच्या सराव सत्रात क्षेत्ररक्षणातील कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मी संघातील अनेक तरुण आणि अनुभवी खेळाडूंनाही भेटलो असून, रविचंद्रन अश्विन आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्याशी मी चर्चा केली असल्याची माहिती दिल्ली कॅपिटलचे (Delhi Capitals) सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद मोहम्मद कैफ (Mohommad Kaif) यांनी माध्यमांना दिली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com