IPL 2022: उमरान मलिक अद्याप टीम इंडियासाठी लायक नाही! शमीने दिले मोठे कारण

आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) गोलंदाजीच्या माध्यमातून शानदार प्रदर्शन करत आहे.
IPL 2022: उमरान मलिक अद्याप टीम इंडियासाठी लायक नाही! शमीने दिले मोठे कारण
Umran MalikDainik Gomantak

आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक गोलंदाजीच्या माध्यमातून शानदार प्रदर्शन करत आहे. अनेक दिग्गज फलंदाजांना त्याने आऊट केले आहे. उमरानच्या प्रतिभेचा गुण असा आहे की, अनेक चाहते आणि दिग्गज त्याला टीम इंडियामध्ये पाहू लागले आहेत. बऱ्याच काळानंतर असा वेगवान गोलंदाज भारतात दिसला आहे, जो त्याच्या वेगाने आश्चर्यचकित करत आहे. मात्र, त्याबाबत प्रत्येकाचा विचार सारखा नसतो. टीम इंडियाकडून खेळणारा अनुभवी आणि स्टार गोलंदाज मोहम्मद शमी उमरान मलिकच्या वेगानं प्रभावित झालेला नाही. (Mohammad Shami has said that Umran Malik is not eligible for Team India yet)

Umran Malik
MS Dhoni: IPL 2022 नंतर धोनी करणार मोठी घोषणा

दरम्यान, शमी बराच काळ टीम इंडियाकडून (Team India) खेळत आहे. सध्या तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) खेळतोय. अलीकडेच त्याला उमरान मलिकबद्दल विचारण्यात आले असता तो म्हणाला की, सध्या मलिकला टीम इंडियासाठी एक शानदार आणि परिपक्व गोलंदाज होण्यासाठी वेळ लागेल. उमरान मलिकशिवाय शमीनेही मोहसीन खानवर वक्तव्य केले.

उमरान मलिकवर मोहम्मद शमीचे वक्तव्य

उमरानच्या वेगाबद्दल बोलताना शमी म्हणाला, 'मला मान्य आहे की, त्याच्याकडे वेग आहे, पण वैयक्तिकरित्या मी वेगाचा फार मोठा चाहता नाही. माझा विश्वास आहे की, जर तुम्ही 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करु शकता आणि चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करु शकता, तर ते फलंदाजांना चकवा देण्यासाठी पुरेसे आहे. त्याच्याकडे अप्रतिम वेग आहे पण त्याला परिपक्व होण्यासाठी अजून थोडा वेळ द्यावा लागेल.'

Umran Malik
IPL 2022: ''...आता आयपीएलमध्ये केकेआरचा बनला हिरो''

मोहसीन खान यांनाही सल्ला देण्यात आला

शमी पुढे म्हणाला की, या युवा वेगवान गोलंदाजांना आयपीएलमधून (IPL 2022) स्व:ताला सिध्द करण्याची चांगली संधी आहे. ते अनुभवी खेळाडूंकडून शिकत आहेत. या मोसमात शानदार गोलंदाजी करणाऱ्या मोहसिनबद्दल शमी म्हणाला, 'मोहसीन खान माझ्यासोबत सराव करायचा. तो एक शानदार गोलंदाज आहे, परंतु त्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हावे लागेल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.