ऑस्ट्रेलियावरून परतताच मोहम्मद सिराजने गाठले कब्रिस्तान; वडिलांना वाहिली श्रद्धांजली   

ऑस्ट्रेलियावरून परतताच मोहम्मद सिराजने गाठले कब्रिस्तान; वडिलांना वाहिली श्रद्धांजली   
Copy of Gomantak Banner (30).jpg

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेवर बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आज मायदेशात परतला. यानंतर भारतीय संघातील खेळाडू आपापल्या घरी परतले. तर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज एअरपोर्टवरुन थेट कब्रिस्तानमध्ये जात त्याने आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. मोहम्मद सिराजने हैद्राबादच्या विमानतळावर उतरल्यानंतर थेट वडिलांवर अंत्यंसस्कार झाले त्या ठिकाणी पोहचला. मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. 

यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या तेराव्या हंगामात मोहम्मद सिराजने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. आयपीएल मधील त्याचा हा खेळ लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी मोहम्मद सिराजची निवड भारतीय संघात करण्यात आली होती. व त्यामुळे तो संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या आयपीएल मधून ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला होता. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी  20 नोव्हेबरला सिराजचे वडील मोहम्मद गौस यांचे निधन झाले. व यावेळी जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमांमुळे त्याला मायदेशात परतणे शक्य झाले नव्हते. तसेच वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने संघासोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. आणि पुढे मैदानावर उतरत धमाकेदार कामगिरी केली होती. त्यानंतर आज ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर मोहम्मद सिराजने थेट कब्रिस्तान गाठत वडिलांना श्रद्धांजली वाहिली. 

यानंतर, मोहम्मद सिराजने देशाकडून क्रिकेट खेळावे, असे स्वप्न सिराजच्या वडिलांनी पाहिले होते. व आज ते असते तर नक्कीच त्यांना याचा अभिमान वाटला असता, असे सिराजचा भाऊ मोहम्मद इस्माइलने सांगितले. मोहम्मद सिराजला ब्लू जर्सीत खेळताना त्याचे वडील मोहम्मद गौस यांनी पहिले होते. मात्र कसोटी भारतीय संघाकडून खेळताना पाहण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.    

​     


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com