Mohammed Shami ला मोठा झटका! तब्बल 5 वर्षांनंतर पत्नी हसीन जहाँबाबत कोर्टाने दिला 'हा' निर्णय

Mohammed Shami And Hasin Jahan: मोहम्मद शमीसोबतच्या वादामुळे हसीन जहाँ तिच्या मुलीसोबत खूप दिवसांपासून वेगळी राहत आहे.
Mohammed Shami
Mohammed ShamiDainik Gomantak

Mohammed Shami And Hasin Jahan: मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. शमीसोबतच्या वादामुळे हसीन जहाँ तिच्या मुलीसोबत खूप दिवसांपासून वेगळी राहत आहे. हसीन जहाँ व्यवसायाने अभिनेत्री आहे. या जोडप्यांवर आता कोलकाता न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे

कोलकाता न्यायालयाने सोमवारी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) त्याची पत्नी हसीन जहाँला मासिक 1 लाख 30 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. 1 लाख 30 हजार रुपयांपैकी 50,000 रुपये हसीन जहाँसाठी वैयक्तिक पोटगी असेल. तर, तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्या मुलीच्या देखभालीसाठी 80,000 रुपये खर्च केले जातील.

Mohammed Shami
Mohammed Shami: जगावर छाप पाडणार 'हा' गोलंदाज! शमीच्या या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

हसीन जहाँने ही मागणी केली होती

2018 मध्ये, हसीन जहाँने न्यायालयात खटला दाखल करुन 10 लाख रुपये मासिक पोटगी देण्याची मागणी केली होती. त्यापैकी 7,00,000 रुपये तिची वैयक्तिक पोटगी आणि उर्वरित 3,00,000 रुपये त्यांच्या मुलीच्या देखभालीसाठी जातील.

हसीनचे वकील मृगांका मिस्त्री यांनी न्यायालयात सांगितले की, शमीच्या 2020-21 या आर्थिक वर्षातील आयकर रिटर्ननुसार, त्या आर्थिक वर्षासाठी त्याचे वार्षिक उत्पन्न 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते आणि त्यावर आधारित आम्ही मासिक उत्पन्नाची (Income) मागणी केली. 10 लाखांची पोटगी अवाजवी नव्हती.

Mohammed Shami
Mohammed Siraj Record: सिराजचा बंजरंगी पराक्रम, शानदार रेकॉर्डला घातली गवसणी

तथापि, शमीचे वकील सेलीम रहमान यांनी दावा केला की, 'हसीन जहाँ स्वत: एक व्यावसायिक फॅशन मॉडेल म्हणून काम करुन स्थिर उत्पन्न मिळवत असल्याने, त्या उच्च पोटगीची मागणी न्याय्य नाही.' अखेर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सोमवारी मासिक पोटगीची रक्कम 1.30 लाख रुपये निश्चित केली.

कोर्टाच्या निर्देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना हसीन जहाँने दावा केला की, मासिक पोटगीची रक्कम जास्त असती तर मला दिलासा मिळाला असता. दुसरीकडे, अद्याप या निर्णयावर मोहम्मद शमीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com